मुंबई – आयपीएल २०२२ मध्ये दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळुरूने २० षटकांत २ गडी गमावून २०५ धावा केल्या. २१ व्यांदा, RCB ने IPL च्या पहिल्या डावात २०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या.
फॅफ डू प्लेसिसने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात अर्धशतक केले. त्याने विराट कोहलीसोबत ११८ धावांची भागीदारी केली. तो ८८ धावा करून बाद झाला. कोहलीचे अर्धशतक हुकले. त्याने ४१ धावा केल्या. कोहलीने शेवटच्या षटकात कार्तिक (३२) सोबत १७ चेंडूत ३७ धावांची भागीदारी केली.