Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: राडा निश्चित! 9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार; ‘या’ जबरदस्त खेळाडूंची अदलाबदली

RCB VS SRH: यंदाचे आयपीएल खास असणार आहे कारण आरसीबीचा संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरणार आहे. समोर देखील एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकलेला संघ असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 28, 2026 | 04:05 PM
IPL 2026: राडा निश्चित! 9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार; ‘या’ जबरदस्त खेळाडूंची अदलाबदली
Follow Us
Follow Us:

९ वर्षांनंतर जुळून आला ऐतिहासिक योगायोग
गोलंदाज अन् फलंदाजांची झाली अदलाबदल 
आज आरसीबी आणि हैदराबाद भिडणार

Tata IPL 2026 RCB vs SRH 2026: आज बंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगलोर अन् सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. 9 वर्षांनी असा योग जुळून आला आहे की, ज्यामध्ये बंगलोर आणि हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान यामध्ये काही खेळाडूंची अदलाबदली झाली असल्याने या सामन्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आज आयपीएलचा पहिला सामना असल्याने चाहत्यांमध्ये उत्साह आहे. हे नेमके खेळाडू कोण आहेत, त्याबाबत जाणून घेऊयात.

यंदाचे आयपीएल खास असणार आहे कारण आरसीबीचा संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरणार आहे. समोर देखील एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकलेला संघ असणार आहे. तब्बल 9 वर्षांची या आयपीएलची सुरुवात बंगलोर विरुद्ध हैदराबाद अशी होणार आहे. 2017 मध्ये आयपीएलची सुरुवात हैदराबाद विरुद्ध बंगलोर अशी झाली होती.

कोणत्या खेळाडूंची झाली अदलाबदली?

2017 मध्ये हैदराबादच्या संघाने बंगलोरला फायनलमध्ये हरवले होते. तर यंदा बंगलोरचा संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरेल. 9 वर्षांमध्ये दोन्ही संघात अनेक बदल झाले आहेत. काही खेळाडू देखील बदलले गेले आहेत. 2017 मध्ये वेळेस बंगलोरच्या संघात ट्रेविस हेड देखील सामील होता. तर भुवनेश्वर कुमार हैदराबादच्या संघात सामील झाला होता.

सनरायझर्स हैदराबादसाठी आनंदाची बातमी, कर्णधार पॅट कमिन्स संघात सामील होणार; पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल का?

मात्र 2026 च्या आयपीएलमध्ये हेच वेगळेपण पाहायला मिळणार आहे. कारण यंदा 2017 मध्ये हैद्राबादच्या संघात असलेला भुवनेश्वर कुमार बंगलोरच्या संघाकडून खेळणार आहे. तर बंगलोरच्या संघात असलेला ट्रेविस हेड आता हैदराबादच्या संघाकडून खेळणार आहे. त्या सामन्यात विराट कोहली खेळला नव्हता. शेन वॅाटसनने बंगलोरच्या संघाची धुरा सांभाळली होती.

2017 मध्ये काय घडले होते? 

2017 मध्ये झालेल्या सामन्यात हैदराबादच्या संघाने बंगलोरच्या संघाला सहज पराभूत केले होते. सनरायजर्स हैद्राबादच्या संघाने 207 धावा केल्या होत्या. तेव्हा युवराज सिंगने 62 धावा केल्या होत्या. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ केवळ 172 धावा करू शकला होता. विराट कोहली त्या सामन्यात खेळला नव्हता. तर भुवनेश्वर कुमारने 2 विकेट घेतल्या होत्या.

Web Title: Bhuvneshwar kumar and travis head changed team rcb vs srh ipl 2026 first match cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • cricket news
  • IPL 2026
  • Travis Head

संबंधित बातम्या

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा
1

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय
2

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
4

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.