फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबद्दल चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या मालिकेचा शुभारंभ 22 नोव्हेंबरपासून होणार आहे, या मालिकेचा पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज झाला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या संदर्भात अनेक वृत्त समोर येत आहेत. यामध्ये अनेक तर्कवितर्क सोशल मीडियावर लावले जात आहेत. आता या मालिकेपूर्वी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२५ चा एक धमाकेदार प्रोमो समोर आला आहे, यामध्ये भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारताचे आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाचे कौतुक केले होते.
व्हिडीओमध्ये भारताचा दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर आहे, ज्यांनी भारताच्या गुणवत्तेबद्दल प्रथम सांगितले. तेव्हा त्याने सांगितले की तुम्हाला भारतात सर्वत्र क्रिकेट पाहायला मिळेल. याशिवाय भारताच्या माजी दिग्गजाने भारतात क्रिकेटला काय महत्त्व आहे हे सांगितले. तर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंग यांनी देखील क्रिकेटचे ऑस्ट्रेलियामध्ये किती महत्व आहे यासंदर्भात सांगितले आहे.
काही काळापासून ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर वर्चस्व गाजवले आहे. 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्याआधी ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. आता बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत दोन्ही संघ कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
7CRICKET PROMO FOR BORDER GAVASKAR TROPHY. 🇮🇳 pic.twitter.com/AM0bm3GCa5 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 19, 2024
पहिली कसोटी – 22 ते 26 नोव्हेंबर
दुसरी कसोटी – पर्थमध्ये – 06 ते 10 डिसेंबर,
तिसरी कसोटी – ॲडलेडमध्ये – 14 ते 18 डिसेंबर,
चौथी कसोटी ब्रिस्बेनमध्ये – 26 ते 30 डिसेंबर,
पाचवी कसोटी मेलबर्नमध्ये – 03 ते 07 जानेवारी, सिडनी.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुबमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा.
राखीव- खलील अहमद, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी.
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.