आशिया कप २०२५(फोटो-सोशल मीडिया)
Commentary panel announced for Asia Cup 2025 : आशिया कप २०२५(Asia cup 2025)या स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व ८ संघ सज्ज झाले आहेत. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. यावेळी असहोय कप टी २० स्वरूपात खेळला जाणार आहे. सर्व सामने यूएईमध्ये खेळला जाणार आहे. भारत १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध आपला पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर १४ सप्टेंबर रोजी भारताचा सामना पाकिस्तानसोबत खेळवला जाणार आहे. अशातच आता ब्रॉडकास्टरने त्यांच्या समालोचन पॅनेल टीमची घोषणा केली आहे. या समालोचन पॅनेलमध्ये भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग तसेच माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची वर्णी लागली आहे.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणार आहे. समालोचन पॅनेल टीममध्ये भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक शास्त्री, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, रॉबिन उथप्पा, बाजीद खान, वकार युनूस, वसीम अक्रम, रसेल अर्नोल्ड आणि सायमन डौल यांचा प्रसारणाच्या जागतिक फीडसाठी निवडलेल्या समालोचकांमध्ये समावेश आहे.
हेही वाचा : ICC कडून मोहम्मद सिराजचा सन्मान! ICC Player of the Month साठी मिळाले नामांकन! ‘हे’ खेळाडूं आहेत स्पर्धेत
हिंदी समालोचनाच्या पॅनेलमध्ये भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, अजय जडेजा, माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर आणि सबा करीम यांना स्थान दिले गेले आहे. भरत अरुण हे तमिळ पॅनेलमध्ये डब्ल्यूव्ही रमन सारख्या माजी खेळाडूंसोबत सामील होणार आहेत. तर तेलुगू पॅनेलमध्ये वेंकटपती राजू आणि वेणुगोपाल राव ही खेळाडू असणार आहे.
सोनी नेटवर्कचे मुख्य महसूल अधिकारी राजेश कौल यांनी सांगितले की, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आशिया कपच्या पुनरागमनासह क्रिकेट प्रसारणाची पुनर्परिभाषा करत आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या प्रकाशनावेळी गावस्कर म्हणाले की “सूर्यकुमार यादव याच्या गतिमान नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया कपच्या मंचावर पाऊल ठेवत आहे. संघाचे नेतृत्व करत असताना आपल्याला चिकाटी आणि अनुभवाचे मिश्रण दिसत असून हा वैविध्यपूर्ण, बहुमुखी आणि लढाऊ संघ भारतीय क्रिकेटच्या भविष्याचे प्रतीक आहे.”
हेही वाचा : ऑस्ट्रेलियन खेळाडू Marcus Stoinis ची नवीन इनिंग सुरू! जोडीदार सारा झारनुचसोबतच्या प्रेमाची दिली कबुली
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, “सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्या नेतृत्वाखालील हा भारतीय संघ उपकर्णधार म्हणून अनुभव आणि तरुणाईचे परिपूर्ण मिश्रण असल्याचे दिसत आहे.” पुढे ते म्हणाले की, “जसप्रीत बुमराह, अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्यासारखे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करत आहेत, तर तिलक वर्मा आणि हर्षित राणा या सारखे प्रतिभावान पर्याय आहेत.”