T20 World Cup 2024 : सध्या भारतामध्ये इंडियायां प्रीमियर लीग २०२४ ची क्रेझ सुरु आहे. परंतु जगभरामध्ये क्रेझ सुरु आहे ती म्हणजेच काही दिवसात सुरु होणाऱ्या T20 वर्ल्ड कपची. इंग्लंडने T20 World Cup 2024 साठी टीम जाहीर केली आहे. जोस बटलरकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. यासोबतच बोर्डाने पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही या खेळाडूंची निवड केली आहे.
1 जूनपासून टी-20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. जॉस बटलरकडे इंग्लंडचे कर्णधारपद मिळाले आहे. बटलर सध्या आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. तो फॉर्मात असून स्फोटक फलंदाजीही करत आहे. बटलरसह मोईन अली आणि जोफ्रा आर्चरलाही स्थान मिळाले आहे. आर्चर बराच काळ इंग्लंड संघातून बाहेर होता. दुखापतीमुळे तो मैदानापासून दूर होता. मात्र आता त्याने पुनरागमन केले आहे.
T20 विश्वचषक 2024 साठी इंग्लंड संघ –
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली (उपकर्णधार), फिल सॉल्ट, विल जॅक, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, मार्क वुड, रीस टोपली, आदिल रशीद, टॉम हार्टले, बेन डकेट.