IND vs NZ Final: Hitman Rohit Sharma's heroics against New Zealand; Included in Sachin Tendulkar's line-up..
IND vs NZ Final : दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 251 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उरतलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली आहे. यासोबतच न्यूझीलंडविरुद्ध त्याने खास कामगिरी केली आहे.
फायनलमध्ये रोहित शर्माने षटकार ठोकून आपले खाते उघडले होते. यासह रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध 1 हजार धावा करणारा खेळाडू बनला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आता विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर या महान फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने काईल जेमिसनने टाकलेल्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावत आपले खाते उघडले. रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेमध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करत त्याने 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितचा न्यूझीलंडविरुद्धचा हा 31वा एकदिवसीय सामना आहे आणि आता त्याच्या नावावर 1 हजार हून अधिक धावा जमा झाल्या आहेत. सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि कोहली यांच्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये 1 हजार धावा किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे.
हेही वाचा : पहा Video: ग्लेन फिलिप्स जेव्हा ‘सुपरमॅन’ बनतो! हवेत सुर मारून क्षणात टिपला अफलातून झेल..
भारताकडून न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. दोन दशकांहून अधिक कालावधीच्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सचिनने न्यूझीलंड विरुद्ध 42 सामने खेळले आणि 1750 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर कोहली आहे, ज्याने 32 सामन्यात 1656 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क आणि मॅट हेन्री/नाथन स्मिथ.