PAK vs IND: Defeat in Champions Trophy still lingers; Former Pakistan captain once again lashes out at India..
PAK vs IND : टीम इंडियाने 12 वर्षाच्या एका तपानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली आहे. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयानंतर भारतामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. तर दुसरीकडे शेजारील देश पाकिस्तानमध्ये दुख:चा डोंगर कोसळल्याप्रमाणे स्थिति असल्याचे पहायला मिळत होते. तेव्हा आजी माजी पाकिस्तानी खेळाडूंकडून भारतावर आगपाखड करण्यात आली होती. त्यात इंझमाम उल हक याचा देखील समावेश होता. आता पुन्हा इंझमाम उल हक संतापला असल्याचे दिसून आले आहे.
अलीकडेच पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. मात्र यात पाकिस्तानला साखळी फेरीतच बाहेर जावे लागले. त्यामुळे पाकिस्तानचे अनेक कोटींचे नुकसान झाले. सध्याचा पाकिस्तान संघ खूपच कमकुवत स्थितीत आहे. या कारणामुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये घरच्या परिस्थितीचा फायदा देखील घेता आला नाही आणि तो आधीच स्पर्धेतून बाहेर पडला होता. पाकिस्तानची हीच परिस्थिती पाहून भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर म्हणाले होते की, ‘भारताचा ब संघही पाकिस्तानच्या अ संघापेक्षा खूप मजबूत आहे.’
सुनील गावस्कर यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकची आग आग झाली होती. तेव्हा त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे . सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो सुनील गावसकर यांच्यावर राग व्यक्त करताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये इंझमाम उल हक म्हणतोय की, ‘यावेळी भारत जिंकला. तो चांगला खेळला आहे, पण गावसकरांनीही एकदा काही आकडेवारी बघायला हवी. एकदा तो शारजाहून पळून गेला कारण पाकिस्तान खेळत होता.’
हेही वाचा : WPL 2025 : डब्लुपीएलमध्ये आजवर न घडलेला इतिहास घडणार? ‘ही’ एमआय महिला फलंदाज विक्रमापासून 3 धावा दूर…
यानंतर इंझमाम पुढे म्हणाला की, ‘सुनील गावस्कर मोठे, ज्येष्ठ आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो, पण देशाविरुद्ध बोलने ठीक नाही, तुमचा संघ चांगला खेळला आहे. तुम्हाला अधिकार आहे. तुम्हाला पाहिजे तितके तुमच्या टीमची स्तुती करा. पण अशा प्रकारे इतरांविरुद्ध बोलणे अत्यंत बेकायदेशीर आहे.’
गावस्कार म्हणाले होते की, ‘भारताची ब टीम देखील पाकिस्तानला आव्हान देऊ शकते.’ ते म्हणाले की, ‘मला वाटते की भारताची ब टीम पाकिस्तानला नक्कीच अडचणीत आणू शकते. मला क संघाबाबत काही खात्री नाही, पण सध्याच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानला पराभूत करणे ब संघासाठी खूप कठीण जाणार आहे.
गावस्कार म्हणाले होते की, ‘भारताची ब टीम देखील पाकिस्तानला आव्हान देऊ शकते.’ ते म्हणाले की, ‘मला वाटते की भारताची ब टीम पाकिस्तानला नक्कीच अडचणीत आणू शकते. मला क संघाबाबत काही खात्री नाही, पण सध्याच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानला पराभूत करणे ब संघासाठी खूप कठीण जाणार आहे.
हेही वाचा : बुरा न मानो होली है: युवराज सिंगने दरवाजा उघडताच सचिन तेंडुलकरकडून रंगाची उधळण…; पहा Video
भारताने न्यूझीलंड संघाचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या विजयाने भारताने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे.