बुरा न मानो होली है: युवराज सिंगने दरवाजा उघडताच सचिन तेंडुलकरकडून रंगाची उधळण...; पहा Video(फोटो-सोशल मीडिया)
Sachin Tendulkar : सध्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग 2025 सुरू आहे. या लीगमध्ये युवराज सिंगने दमदार खेळी करून पुन्हा आठवणी जाग्या केल्या आहेत. त्याने इंडिया मास्टर्सकडून खेळताना दमदार अर्धशतक झाळकावले आहे. युवराज सिंग आणि शहबांज नदीमच्या चार विकेट्सच्या जोरावर पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा 94 धावांनी पराभव करून इंडिया मास्टर्सने आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दरम्यान होळीच्या निमित्ताने सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांनी धमाल मस्ती केल्याचे दिसून येत आहे. सचिन तेंडुलकर आपल्या सोशल मिडियावर या मस्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
हेही वाचा : WPL 2025 : डब्लुपीएलमध्ये आजवर न घडलेला इतिहास घडणार? ‘ही’ एमआय महिला फलंदाज विक्रमापासून 3 धावा दूर…
व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर म्हणतो की, वॉटर गन भरली आहे. आम्ही युवराज सिंह साहबच्या खोलीत जात आहोत, ते झोपले आहेत. त्यांनी काल रात्री खूप षटकार मारले. त्यानंतर एका मित्राने दाराबाहेर उभे राहून एक हाक मारली, ‘हाऊस कीपिंग’ आणि यानंतर, युवराजने दरवाजा उघडताच त्याच्यावर रंग आणि गुलाल टाकण्यात आले. सचिनसह इतर खेळाडूंना त्याला पाहताच अश्रू अनावर झाले होते. हा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.
#WATCH | Cricket legend Sachin Tendulkar was seen celebrating Holi with enthusiasm
He tweeted, “Holi fun with my International Masters League teammates, from blue jerseys to colourful moments, this is how we say, “Happy Holi!”
(Video Source: Sachin Tendulkar/X) pic.twitter.com/5sxpqFqz3n
— ANI (@ANI) March 14, 2025
हेही वाचा : Mohammad Shami : मोहम्मद शमीच्या मुलीने खेळली होळी; चाहत्यांनी ठरवलं ‘गुन्हेगार’, पत्नीलाही लावले बोल..
रायपूर येथे खेळवण्यात आलेल्या इंटरनॅशनल मास्टर्स T20 लीग 2025 च्या उपांत्य फेरी सामन्यात युवराज सिंग याने पुन्हा एकदा आपल्या तडाखेबाज शैलीचे दर्शन घडवले आहे. त्यामुळे चाहत्यांना 2007 टी-20 वर्ल्ड कपची आठवण झाली. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर ब्राइस मॅकगॅनला टार्गेट केले होते. ज्याच्या एका षटकात युवराज सिंगने सलग तीन षटकार ठोकत आपली झलक दाखवली.
आयपीएल 2025 चा पहिला सामना २२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025 पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – रजत पाटीदार
सनराझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
चेन्नई सुपर किंग्स -ऋतुराज गायकवाड
मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल
लखनौ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
गुजरात जायंट्स – शुभमन गिल
पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर