भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे आज भारताचे संघाने मालिकेचे पहिले सामन्यात 140 धावांनी विजय मिळवला. भारताचा संघ आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये नव्या कर्णधारासह ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा कडून कर्णधार पद काढून भारताच्या संघाचे कर्णधार पद आता शुभमन गिलकडे सोपवले जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
शुभमन गिल आता भारतीय संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे तर श्रेयस अय्यर हा टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार आहे. त्याचबरोबर अक्षर पटेल त्याला देखील सांगा मध्ये स्थान मिळाले आहे. के एल राहुल हा संघाचा विकेटकीपर असणार आहे. नितेश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना अष्टपैलू म्हणून संघामध्ये स्थान मिळाले आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव याला स्थान मिळाले आहे.
वेगवान गोलंदाजांमध्ये हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना संघामध्ये स्थान मिळाले आहे. एकदिवसीय संघामधून जसप्रीत बुमराहला याला वगळण्यात आले आहे. ध्रुव जुरेल याला पर्याय म्हणून विकेटकीपरची जागा मिळाली आहे. प्रसिद्ध कृष्ण आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनाही संघांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
🚨 India’s squad for Tour of Australia announced Shubman Gill named #TeamIndia Captain for ODIs The #AUSvIND bilateral series comprises three ODIs and five T20Is against Australia in October-November pic.twitter.com/l3I2LA1dBJ — BCCI (@BCCI) October 4, 2025
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), यशस्वी जयसवाल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या t20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे कर्णधार सोपवण्यात आले आहे. तर भारताचा उपकर्णधार शुभमन गिल असणार आहे. या संघामध्ये जो संघ आशिया कप मध्ये खेळवण्यात आला होता तोच संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळताना दिसणार आहे. T20 मालिकेमध्ये जसप्रीत बुमराहचे संघामध्ये पुनरागमन होणार आहे. या t20 संघामध्ये वॉशिंग्टन सुंदरला देखील स्थान देण्यात आले आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सैमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर.