
Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती
दरम्यान, स्पर्धेच्या उद्घाटनाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. ज्यात संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष कामत, ट्रस्टी डॉ. नाबर प्रसाद व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांचा सहभाग होता.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत मुंबईच्या शंकर सावर्डेकरने रत्नागिरीच्या गणेश पाटणकरचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २५-१५, १२-२५, २५-१४ असा पराभव करत आगेकूच केली. तर इतर सामन्यात मुंबईच्या संजय मोहितेने पालघरच्या श्रीकांत कांबळेचा २५-०, २५-९ असा, तर ठाण्याच्या विनायक वाखाणकारने मुंबईच्या मनोज दरेकरचा २५-४, २५-१० असा, पुण्याच्या अभिजीत त्रिपनकरने मुंबईच्या रामदास सावर्डेकरचा २५-०, २५-५ असा, रायगडच्या अब्दुल रहमान हमीदने सुधीर जाधवचा २५-२४, १८-१५ असा आणि सिंधुदुर्गच्या अनिल तायशेटेने अश्विनीकुमार सेठचा २५-१०, २५-० असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
जयंत साळगावकर यांनी कॅरम या खेळाचा उगम भारतात झाला असून पतियाळाच्या महाराजांच्या काळापासून हा खेळ भारतात खेळला जात असल्याचे सांगितले. तर दिनेश लाड यांनी ते क्रिकेटमध्ये गेले नसते तर कदाचित कॅरम खेळाडू झाले असते असे सांगितले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने प्रमुख पाहुणे दिनेश लाड व जयंत साळगावकर यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने सत्कार करण्यात आला.