Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO : अखेर पाकिस्तानी खेळाडूने मर्यादा सोडत केली शिवीगाळ; विराटला जीवनदान मिळाल्यानंतर हरिस रौफचा नसीमवर संताप

Champions Trophy 2025 : विराट कोहलीला बाद करण्याची संधी हुकल्यानंतर पाकिस्तानी संघात इतका तणाव निर्माण झाला की खेळाडू एकमेकांशी भांडू लागले आणि शिवीगाळ करू लागले.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 24, 2025 | 05:14 PM
VIDEO : अखेर पाकिस्तानी खेळाडूने मर्यादा सोडत केली शिवीगाळ; विराटला जीवनदान मिळाल्यानंतर हरिस रौफचा नसीमवर संताप
Follow Us
Close
Follow Us:
Champions Trophy 2025 IND vs PAK Match : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वाधिक हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. विराट कोहलीने शानदार शतक झळकावत पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. विराटला हरि, रौफच्या चेंडूवर जीवदान मिळाल्यानंतर हरिस रौफचा पारा चांगलाच वाढला आणि मर्यादेची सीमा ओलांडत नसीम शाहला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओसुद्धा चांगलाच व्हायरल होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव होता. विराट कोहलीने त्याच्या ५१ व्या शतकासह पाककडून सामना हिसकावून घेतला. पण सामन्यात एक क्षण असा आला जेव्हा ग्रीन आर्मीला विराटला बाद करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
विराटला हरिस रौफच्या चेंडूवर जीवदान

pic.twitter.com/zAz3SlaEB5

— kuchbhi@1234567 (@kuchbhi12341416) February 23, 2025

कर्णधार रोहित शर्माची विकेट लवकरच गेली
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांच्या शानदार खेळीमुळे २४१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताची सुरुवात चांगली झाली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक सुरुवात केली. पाचव्या षटकात शाहीन आफ्रिदीने रोहित शर्माला बाद करून पाकिस्तानला मोठे यश मिळवून दिले. परंतु, त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही.
हरिस रौफच्या चेंडूवर विराटला मिळाले जीवदान
पाकिस्तानी गोलंदाजांमध्ये हरिस रौफ सर्वात धोकादायक दिसत होता. ११ व्या षटकात विराट कोहलीची विकेट घेण्याची त्याला सुवर्णसंधी होती. रौफच्या चेंडूवर ऑफ स्टंपच्या बाहेर कोहलीने शॉट मारला आणि चेंडू थर्ड मॅनकडे गेला. नसीम शाह थर्ड मॅनच्या सीमेवर क्षेत्ररक्षण करीत होता. त्याच्या जवळ चेंडू पडला परंतु तिथपर्यंत नसीम पोहचू शकला नाही.
नसीम शाह कॅचपर्यंत नाही पोहचला
नसीम चेंडू पकडण्यासाठी धावण्याऐवजी, त्याने चेंडू थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे हरीस रौफ निराश झाला आणि त्याने रागाच्या भरात नसीम शाहला शिवीगाळ केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली, ज्यामुळे पाकिस्तानी संघातील तणाव स्पष्टपणे उघड झाला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील राजा आणि प्रिन्स यांनी मिळून ७५ चेंडूत ६९ धावांची भागीदारी करून विजयाचा पाया रचला. या दरम्यान, १५ धावांचा वैयक्तिक स्कोअर गाठल्यानंतर, विराट १४ हजार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा करणारा जगातील तिसरा क्रिकेटपटू बनला. श्रेयस आणि विराट यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठी १२८ चेंडूत ११४ धावांच्या भागीदारीने सामन्याचा निकाल निश्चित केला.
हेही वाचा : IND vs PAK Match : विराट कोहलीच्या शतकानंतर इस्लामाबादमध्ये साजरी झाली दिवाळी; आनंदाने उड्या मारू लागल्या मुली; पाहा VIDEO

Web Title: Champions trophy 2025 ind vs pak match pakistani bowler haris rauf started abusing to naseem when virat was given a lifeline haris rauf got angry on naseem shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • Haris Rauf
  • india
  • pakistan
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
1

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
2

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
3

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
4

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.