अभिषेक नायर आणि रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी, बीसीसीआयकडून आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघ निवडीबाबत माहिती दिली. सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे तर शुभमन गिलल उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याच वेळी, रिंकू सिंग, हर्षित राणा, सुज सॅमसन आणि जितेश शर्मा सारख्या खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु, चँपियन ट्रॉफी असो वा आयपीएल २०२५ या दोन्ही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून देखील आशिया कपसाठी त्याचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे निवडकर्त्यांवर अनेकांनी रोष व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये आता टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याने देखील संघाच्या निवडीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप
टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरच्या मते, श्रेयस अय्यरला आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघात स्थान द्यायला हवे होते. अय्यरला आशिया कप संघातून बाहेर का ठेवण्यात आले हे त्याला कळत नाहीये?
अय्यरला स्थान न देणे हे न समजण्यासारखे..
आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा झाल्यानंतर अभिषेक नायर याने ‘जियोहॉटस्टार’शी संवाद साधला. या दरम्यान त्याने सांगितले की, “२० सदस्यीय संघात श्रेयस अय्यरला समाविष्ट न करण्याचे कारण काय असू शकते हे मला कळत नाहीये, मी अंतिम १५ बद्दल बोलत नाहीये, तर २० बद्दल बोलत आहे.” पुढे ते म्हणाले की, “संघात अय्यरला समाविष्ट करून न घेतल्याने स्पष्टपणे एक संदेश जातो की तो निवडकर्त्यांच्या योजनांमध्ये नाही, किमान टी२० स्वरूपाच्या दृष्टिकोनातून तरी नाही.”
अय्यरची आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
श्रेयस अय्यरने आयपीएल २०२५ मध्ये सर्वांना प्रभावित करेल अशी कमगिरी केली आहे. या दरम्यान त्याने पंजाब किंग्जसाठी आपल्या नेतृत्वासोबत फलंदाजीमध्ये देखील आपले कौशल्य दाखवून दिले. आयपीएल २०२५ मध्ये अय्यरने एकूण १७ सामन्यांमध्ये ५०.३३ च्या सरासरीने ६०४ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण ६ अर्धशतके ठोकली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने या हंगामात अंतिम फेरीत धडक मारली होती.
सूर्य कुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित राणा, रिंकू सिंग.
राखीव खेळाडू: यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसीध कृष्णा