Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess Tournament : निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत तामोजी चक्रवर्ती, अमृता लाड प्रथम

Chess Tournament : मुंबई विभागीय बीओबी निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष गटात तामोजी चक्रवर्ती, तर महिला गटात अमृता लाड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. पुरुष गटात विकास महाडिक यांनी द्वितीय, तर अनिकेत सकपाळ यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 09, 2026 | 06:36 PM
Chess Tournament : निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत तामोजी चक्रवर्ती, अमृता लाड प्रथम

Chess Tournament : निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत तामोजी चक्रवर्ती, अमृता लाड प्रथम

Follow Us
Follow Us:
  • पुरुष गटात तामोजीला ४.५ गुण
  • महिला गटात अमृता लाड २.५ गुणांसह अव्वल
  • पुरुष गटात अनिकेत, तर महिला गटात इंदिरा तृतीय स्थानी
 

बँक ऑफ बडोदा (बीओबी), मुंबई विभाग आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या सहकार्याने आयोजित मुंबई विभागीय बीओबी निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत (Chess Tournament) पुरुष गटात तामोजी चक्रवर्ती, तर महिला गटात अमृता लाड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. पुरुष गटात विकास महाडिक यांनी द्वितीय, तर अनिकेत सकपाळ यांनी तृतीय क्रमांक मिळविला. महिला गटात देवी शांती यांनी द्वितीय, तर इंदिरा राणे यांनी तृतीय स्थान मिळविले.

तामोजी व विकासमध्ये रंगतदार लढत

बॅलार्ड पियर येथील बीओबी क्रीडा गृहात झालेल्या या स्पर्धेतील पुरुष गटाच्या निर्णायक पाचव्या फेरीत पहिल्या पटावर तामोजी चक्रवर्ती आणि विकास महाडिक यांच्यात रंगतदार लढत झाली. विकास महाडिक यांच्या आक्रमक चालींना तामोजी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. अखेर 23व्या चालीला हा सामना बरोबरीत सुटला. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी 4.5 गुण मिळविले; मात्र सरस सरासरीच्या आधारे तामोजी यांनी प्रथम, तर विकास महाडिक यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

पुरुष गटातील दुसऱ्या पटावरील सामन्यात अनिकेत सकपाळ यांनी संकेत साकरे यांच्यावर मात केली. अनिकेत यांनी 28व्या चालीला प्रतिस्पर्ध्याच्या राजाला कोंडीत पकडत विजय मिळविला. या विजयासह त्यांनी चार गुणांची कमाई करत तृतीय क्रमांक पटकाविला.

SA vs AUS: स्टीव्ह स्मिथने डरकाळी फोडली; ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासात घातला ‘हा’ धुमाकूळ

महिला गटात अमृता लाडला जेतेपद

महिला गटातील निर्णायक सामन्यात अमृता लाड आणि देवी शांती यांच्यातील लढत 14 चालींनंतर बरोबरीत सुटली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी 2.5 गुण मिळविले. सरस सरासरीच्या आधारे अमृता यांनी प्रथम, तर देवी शांती यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. अन्य एका सामन्यात इंदिरा राणे यांनी आक्रमक चालींच्या जोरावर नवेजीता गुलेरी यांना पराभूत केले. दोन गुणांसह त्यांनी तृतीय स्थान मिळविले.

स्पर्धेतील विजेत्यांचे मुंबई विभागीय सहाय्यक महाव्यवस्थापक सागर आर., क्रीडा संयोजक प्रदीप सुरोशे, मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजाबाबू गजेंगी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी अभिनंदन केले.

क्रिकेट फिव्हर ऑन! Hong Kong Sixes साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार IND vs PAK महामुकाबला

Web Title: Chess tournament mumbai divisional chess selection chakraborty amruta lad win rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • Bank OF Baroda
  • Chess Championship
  • Sports

संबंधित बातम्या

Prakash Padukone : लहान शहरांत दडलेत भारताचे भावी बॅडमिंटन चॅम्पियन; प्रकाश पदुकोणांचा विश्वास
1

Prakash Padukone : लहान शहरांत दडलेत भारताचे भावी बॅडमिंटन चॅम्पियन; प्रकाश पदुकोणांचा विश्वास

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.