Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम, सौजन्य : सोशल मीडिया
इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (ICC) ने क्रिकेटचे अनेक नियम जारी केले आहे, जे गुरुवार 1 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. दरम्यान, हे नियम सध्या सुरू असलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय मालिकेत लागू होणार नाहीत, मात्र 1 ऑक्टोबर वा त्यानंतर सुरू होणाऱ्या सर्व मालिकांना हे नियम लागू होतील.
यात सर्वात महत्त्वाचा नियम (Cricket New Rules) असा की, फलंदाजीदरम्यान वेळ फुकट घालवल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 5 धावा पेनल्टीच्या रुपात मिळतील. तसेच वनडे व टी-२० इंटरनॅशनलमध्ये हेड कोच ड्रिंस्क ब्रेकदरम्यान मैदानात येऊ शकतील. महिला क्रिकेटमध्ये ही व्यवस्था अगोदरपासून लागू होती. त्यासोबतच चेंडूची साइज व वजनाच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. चला आपण आयसासीच्या या नव्या 7 नव्या नियमांचा आढावा घेऊया.
आता फलंदाजी करताना वेळ खराब फुकट घालवल्यास अथवा खराब केल्यास फलंदाजाला अगोदर इशारा दिला जाईल. असे पुन्हा केल्यास दुसऱ्यांदा इशारा दिला जाईल, पण तिसऱ्यांदा असे झाल्यास त्यांच्या धावसंख्येतील 5 धावा कापल्या जातील व त्या प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येत जमा होतील.
कसोटी क्रिकेटमध्ये खराब प्रकाशामुळे येणाऱ्या अडचणी पाहता दोन्ही संघ आपापसातील सहमतीने पिंक बॉलचा वापर करू शकतात. याचाच अर्थ आता कमी प्रकाश अथवा खराब प्रकाशामुळे सामना थांबणार नाही. तसेच गरज पडल्यास संघ पिंक बॉलने दिवसाच्या कसोटीतही वापर करू शकतात. याआधी फक्त डे-नाईट कसोटी सामन्यातच पिंक बॉलचा वापर व्हायचा.
IND Vs WI: हे अचानक काय घडले? Washington Sundar ला केले गेले रिलीज, BCCI चा प्लॅन काय?
आता कसोटी सामन्यात अखेरच्या षटकांत विकेट पडल्यानंतर दिवसाचा खेळ आपोआप संपणार नाही. जर षटकांतील इतर चेंडू शिल्लक असतील आणि खेळण्याची स्थिती असेल, तर ते षटक पूर्ण केले जाईल.
ओव्हरथ्रोची व्याख्या स्टंप्सच्या दिशेने चेंडू फेकण्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नाप्रमाणे केली जाते. यात साध्या चुकीच्या क्षेत्ररक्षणाचा (मिसफिल्ड) समावेश करण्यात आलेला नाही.
आता रन आउट वा स्टम्पिंगसाठी बेल्स पाडताना क्षेत्ररक्षकांचे चेंडूवर पूर्ण नियंत्रण असणे गरजेचे आहे. फक्त बेल्सला हात लागण्याला वैध्य ठरवले जाणार नाही.
Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल
टणक आकार आणि वजनेच्या विशिष्ट सूचनेअंतर्गत पुरुष, महिला आणि ज्यूनियर क्रिकेट चेंडूचे तीन वेगवेगळ्या श्रेणी स्थापित करण्यात येतील.
सामन्याच्या मध्ये 15 मिनिटांचा निश्चित अंतर लागू करण्यात आले आहे. जर काही कारणास्तव सामन्याची वेळ कमी केली असेल, तर ती कमी करून 10 मिनिटांची केली जाऊ शकते.






