Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sportsfield Monsoon League: सलग दोन विजय! १४ वर्षांखालील लीगमध्ये ‘क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी’चा दमदार परफॉर्मन्स

Cricket News: दुसऱ्या सामन्यात विवान देशमुख याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर क्रकेट नेक्स्ट ॲकॅडमीने विजय क्रिकेट ॲकॅडमीचा ७ गडी राखून सहज पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 09, 2026 | 05:31 PM
क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी संघाचे सलग दोन विजय

क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी संघाचे सलग दोन विजय

Follow Us
Follow Us:
  • ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा
  • क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी संघाचे सलग दोन विजय
  • सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर सुरू आहे स्पर्धा 
पुणे/Cricket News: स्पोर्ट्‌सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पाचव्या ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी संघाने मिलेनीयम नॅशनल स्कूल (pune) आणि विजय क्रिकेट ॲकॅडमी या संघांचा पराभव करून सलग दोन विजयांची नोंद केली.

अद्वैत अमोंडकरचे अर्धशतक

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अद्वैत अमोंडकर याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीने मिलेनीयम नॅशनल स्कूलचा ६९ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीने १७४ धावांचे लक्ष्य उभे केले.

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम

अव्देत अमोंडकर याने २७ चेंडूत १ चौकार आणि ६ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. याला उत्तर देताना मिलेनीयम नॅशनल स्कूलचा डाव १०५ धावांवर मर्यादित राहीला. आर्यन एस. याने ३५ धावांची खेळी केली. सीएनए संघाकडून रोहन यादव याने २० धावांत तीन गडी टिपले.

विवान देशमुखची अचूक गोलंदाजी

दुसऱ्या सामन्यात विवान देशमुख याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर क्रकेट नेक्स्ट ॲकॅडमीने विजय क्रिकेट ॲकॅडमीचा ७ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळताना विजय क्रिकेट ॲकॅडमीने ३० षटकात १६५ धावा धावफलकावर लावल्या. तुशार बांगर याने नाबाद ५८ धावा केल्या. दुसऱ्या बाजुने सचिन बोरा (२९ धावा) आणि सिध्दांत पाटील (२३ धावा) यांनी धावा करून संघाचा डाव उभा केला. हे लक्ष्य क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीने २४ षटकात पूर्ण केले. रचित पाटील (नाबाद ४७ धावा), कार्तिक बेराड (३८ धावा) यांनी प्रामुख्याने धावा करून संघाला सलग दुसरा विजय मिळवून दिला.

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंटतर्फे आयोजित पाचव्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’ अजिंक्यपद १४ वर्षांखालील ३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत विजय क्रिकेट ॲकॅडमी आणि इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनने दमदार कामगिरी करत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. विजय क्रिकेट ॲकॅडमीने फॅन्टम क्रिकेट क्लबचा आठ गडी राखून पराभव करत सलग तिसरा विजय नोंदविला. इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनने अष्टपैलू स्पोर्ट्स संघावर तीन धावांनी मात करत सलग पाचवा विजय मिळविला.

Web Title: Cricket next academy team secures two consecutive wins in the sportsfield monsoon league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय
1

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय

Q Sports League 2026: आरसीबीसी लेजंड्सचे वर्चस्व, सलग दोन विजयांसह मारली बाजी
2

Q Sports League 2026: आरसीबीसी लेजंड्सचे वर्चस्व, सलग दोन विजयांसह मारली बाजी

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं
3

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं

Table Tennis: पुण्यात मानांकन टेनिस स्पर्धेचा थरार; अव्वल खेळाडूंना झुंजवत नवोदित खेळाडूंची जोरदार मुसंडी
4

Table Tennis: पुण्यात मानांकन टेनिस स्पर्धेचा थरार; अव्वल खेळाडूंना झुंजवत नवोदित खेळाडूंची जोरदार मुसंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.