Ecole Recreation Excellence Cup
Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद
प्रथम फलंदाजी करताना व्हिक्टरी क्विन्स्ने ३० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. यात मानसी तजाने हिने ४४ तर आराध्य चौधरी हिने ३४ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात रॉयल स्ट्रायकर्सने हे लक्ष्य २९.२ षटकांत ७ गडी गमावून पूर्ण केले. श्रृती गिते हिने ६७ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६९ धावांची मॅचविनिंग खेळी केली. लावण्या देशवंडीकर हिने १४ धावा जोडल्या.
दुसऱ्या लढतीत कल्याणी कुटेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर शि वॉरीयर्स इलेव्हनने लेडी लेजंड संघावर ६ गडी राखून सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लेडी लेजंडचा संपूर्ण संघ २७ षटकांत ११९ धावांत गारद झाला. श्रध्दा जगताप हिने सर्वाधिक ४६ धावा केल्या. शि वॉरीयर्सकडून मधुरा एस. हिने ११ धावांत ३ तर कल्याणी कुटे हिने ११ धावांत २ बळी टिपले. विजयासाठीचे १२० धावांचे लक्ष्य शि वॉरीयर्सने २४ षटकांत ४ बाद १२१ धावा करत पार केले. आराध्या बोटवे (३८ धावा), सानिका लोकरे (नाबाद १७ धावा) आणि नियती सादगिर (नाबाद १२ धावा) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
व्हिक्टरी क्विन्स्: ३० षटकांत ४ बाद १७२ धावा (मानसी तजाने ४४, आराध्य चौधरी ३४, अक्शीता गुप्ता २-२२) पराभूत वि. रॉयल स्ट्रायकर्स: २९.२ षटकांत ७ बाद १७३ धावा (श्रृती गिते नाबाद ६९ [६७ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार], लावण्या देशवंडीकर १४, दुर्गा ठाकूर २-२६, अक्क्षरा परदेशी २-३७).
सामनावीर: श्रृती गिते.
लेडी लेजंड: २७ षटकांत सर्वबाद ११९ धावा (श्रध्दा जगताप ४६, गौरी तापकीर १३, मधुरा एस. ३-११, कल्याणी कुटे २-११) पराभूत वि. शि वॉरीयर्स इलेव्हन: २४ षटकांत ४ बाद १२१ धावा (आराध्या बोटवे ३८, सानिका लोकरे नाबाद १७, नियती सादगिर नाबाद १२, श्रद्धा जगताप ३-१६).
सामनावीर: कल्याणी कुटे.






