Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs GT : Shubhman Gill चा टी-२० क्रिकेटमध्ये धुमाकूळ! विराट कोहलीच्या भीम पराक्रमालाही लावला सुरंग; वाचा सविस्तर.. 

 आयपीएल २०२५ च्या ६० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे. तसेच कर्णधार शुभमन गिलने या सामन्यात विराट कोहलीचा विक्रम मागे टाकला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 19, 2025 | 02:17 PM
DC vs GT: Shubhman Gill's T20 cricket feat! He also put a dent in Virat Kohli's Bheem feat; Read in detail..

DC vs GT: Shubhman Gill's T20 cricket feat! He also put a dent in Virat Kohli's Bheem feat; Read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

DC vs GT :  आयपीएल २०२५ च्या ६० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने दिलेले २०० धावांचे टार्गेट गुजरात टायटन्सने साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शानदार खेळाच्या जोरावर सहज पूर्ण करून दिल्लीवर १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात शुभमन गिलने ५३ चेंडूत नाबाद ९३ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने एक विक्रम रचला आहे.

शुभमन गिलला विराट कोहलीचा उत्तराधिकारी मानले जात आहे.  ते त्याने सिद्ध करून दाखवले आहे. त्याने आयपीएल २०२५ च्या ६० व्या सामन्यात दिल्लीविरुद्ध दिसून आले, जेव्हा गिलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ९३ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत गिलने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडीत काढला.

हेही वाचा : IND Vs END : इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून डेटा विश्लेषकाची गच्छती! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी घेतला मोठा निर्णय

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याच्या बाबतीत शुभमन गिलने आता दिग्गज कोहलीला देखील मागे सोडले आहे. गिलने १५४ डावांमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये ५००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोहलीने १६७ डावांमध्ये टी-२० मध्ये ५००० धावा पूर्ण केल्या होत्या. भारताकडून टी-२० मध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. राहुलने केवळ १४३ डावांमध्ये ५००० टी-२० धावा पूर्ण करण्याचा भीम पराक्रम केला होता.

सर्वात जलद ५,००० टी-२० धावा करणारे भारतीय खेळाडू

  1. १४३ डाव – केएल राहुल
  2. १५४ डाव – शुभमन गिल*
  3. १६७ डाव – विराट कोहली
  4. १७३ डाव – सुरेश रैना
त्याच वेळी, एकूण टी-२० मध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याचा विश्वविक्रम ख्रिस गेलच्या नावावर जमा आहे. गेलने टी-२० मध्ये १३२ डावांमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे. गिल टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारा जगातील सहावा फलंदाज ठरला आहे.
Discipline in the details 💙 pic.twitter.com/hTOQLaP5RG — Shubman Gill (@ShubmanGill) May 18, 2025

टी-२० मध्ये ५,००० धावा करणारा सर्वात जलद फलंदाज (५,००० टी-२० धावा करणारा सर्वात जलद)

  1. १३२ डाव – ख्रिस गेल
  2. १४३ डाव – केएल राहुल
  3. १४४ डाव – शॉन मार्श
  4. १४४ डाव – डेव्हॉन कॉनवे
  5. १४५ डाव – बाबर आझम
  6. १५४ डाव – शुभमन गिल*
हेही वाचा : IPL 2025 : Vaibhav Suryavanshi च्या वयाची पुन्हा चर्चा! दाढी आणि मिश्या असलेल्या फोटोने उठला गदारोळ, ‘हा’ आहे खरा आकडा…

या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ २० षटकांत तीन गडी गमावून १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात साई सुदर्शनच्या नाबाद १०८ धावांच्या खेळी आणि गिलच्या नाबाद ९३ धावांच्या खेळीमुळे गुजरात टायटन्सने १० विकेट्सने हा सामना सहज जिंकला. या विजयासह, गुजरात संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

Web Title: Dc vs gt shubhman gill breaks virat kohlis record in t20 cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर
1

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?
2

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार
3

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
4

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.