वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीच्या नावाची सर्वात जास्त चर्चा होत आली आहे आणि होत आहे. त्याला आता परिचयाची गरज राहिली नाही. ज्या वयात मुलांना भविष्यात आपण काय बनणार असा प्रश्न भेडसावत असतो त्या वयात वैभवने क्रिकेटच्या जगात स्वतःच्या नावाची छाप पाडली आहे. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये खेळणारा केवळ सर्वात तरुण खेळाडूच नाही तर सर्वात तरुण शतक झळकवणारा खेळाडू देखील ठरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या या फलंदाजाने गुजरातविरुद्ध जलद शतक झळकावून क्रीडा विश्वाचे लक्ष खेचून घेतले होते.
एकीकडे वैभव सूर्यवंशी यांचे खूप कौतुक आहे तर दुसरीलकडे सोशल मीडियावर काही चाहत्यांकडून त्याची बदनामी देखील केली जात आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक मार्कशीट व्हायरल जाहले होते. त्यात वैभव सूर्यवंशी हा दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याचा दावा करण्यात आला होता. तथापि, त्यानंतर हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आले होते.
आता वैभव सूर्यवंशीचा आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये त्याला दाढी आणि मिशा आहेत. हे पाहून कुणालाही वाटेल की, वाटेल वैभव १४ वर्षांचा नाही तर तो २० वर्षांचा आहे. हे चित्र वैभव सूर्यवंशीच्या वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता जास्त आहे. पण या चित्रामागील खरे सत्य काही वेगळेच आहे.
Vaibhav Sooryavanshi with Beard ☠️ pic.twitter.com/h6KZc0qZrw
— V. (@Mybrovirat) May 2, 2025
चित्रात वैभव सूर्यवंशीची दाढी आणि मिशा ज्या प्रकारे दिसत आहेत, त्यावरून तो १४ वर्षांचा असल्याचे बिलकुल वाटत नाही. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये वैभव राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमध्ये दिसून येत आहे. तथापि, वैभव सूर्यवंशीचा हा दाढी आणि मिशा असलेला फोटो पूर्णपणे बनावट असल्याचे आणि तो एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असल्याचे आता उघड झाले आहे. ज्या अकाउंटवरून ते शेअर केले करण्यात आले आहे. ते देखील एक विडंबनात्मक अकाउंट असल्याचे समजते.
सूर्यवंशीचा हा फोटो सोशल मीडियावरील एका अकाउंटवरून शेअर केला गेला आहे. तथापि, ही विश्वासार्ह माहिती नाही. लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत आणि म्हणत आहेत की त्याचा चेहरा रियान परागसारखा दिसून येत आहे. एका वापरकर्त्याने तर त्याला ‘रियान पंत’ असे देखील म्हटले आहे. यामध्ये सूर्यवंशीच्या फोटोमध्ये एडिटिंग करून दाढी आणि मिशा जोडण्यात आल्या असल्याचे दिसते.