फोटो सौजन्य - The Hundred सोशल मीडिया
‘द हंड्रेड वुमेन्स २०२४ फायनल’ : ‘द हंड्रेड वुमेन्स २०२४’ ची काल फायनलचा सामना पार पडला. या अंतिम सामन्यामध्ये वेल्श फायर विरुद्ध लंडन स्पिरिट यांच्यामध्ये हा सामना रंगला होता. लंडन स्पिरिट महिला संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये वेल्श फायर महिला संघाने पहिले फलंदाजी करून ८ विकेट्स गमावून ११५ धावा केल्या होत्या. लंडन स्पिरिट महिला संघाला ‘द हंड्रेड वुमेन्स २०२४’ चे जेतेपद मिळवण्यासाठी ११६ धावांची गरज होती. लंडन स्पिरिट या संघाने ९८ चेंडूंमध्ये ११६ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि संघाला विजय मिळवून दिले. लंडन स्पिरीट वुमन आणि वेल्श फायर वुमन यांच्यात खेळला गेलेला अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला आणि शेवटपर्यंत कायम राहिला.
‘द हंड्रेड वुमेन्स २०२४’ यामध्ये दीप्ती शर्मा लंडन स्पिरिट या संघामधून खेळत होती. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लंडन स्पिरीटला विजेतेपदासाठी शेवटच्या ३ चेंडूत ४ धावांची गरज होती. तोपर्यंत संघाने ६ विकेट गमावल्या होत्या. भारतीय क्रिकेट संघाची स्टार दीप्ती शर्मा या संपावर उपस्थित होती. एकेरी घेण्याऐवजी दीप्तीने गोलंदाजी करणाऱ्या हिली मॅथ्यूजला षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. दीप्तीचा षटकार पाहून तिच्या संघातील बाकीचे खेळाडू पूर्णपणे चकित झाले.
हेदेखील वाचा – आयपीएल २०२५ मध्ये रिंकू सिंह या संघामधून खेळणार? खेळाडूने स्वतः केला खुलासा
११६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंडन स्पिरिट संघाने ९८ चेंडूत ११८/६ धावा करून विजयाची नोंद केली. जॉर्जिया रेडमायनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ३२ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. या शानदार खेळीसाठी जॉर्जिया रेडमायनला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताबही देण्यात आला.
With 4️⃣ runs needed and 3️⃣ balls left, Deepti Sharma hits a 6️⃣ to WIN it! 😳#TheHundred https://t.co/u57MSy7ga0 pic.twitter.com/i46RTvWFG1
— The Hundred (@thehundred) August 18, 2024