Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रीडा शिक्षकच नसले तर खेळाडू कसे घडणार? भरती रखडल्याने आमरण उपोषणाला सुरूवात; ४ हजार ८६० पदांची भरती…

शासन निर्णयानुसार पदांना मंजुरी मिळूनही सेवा शर्ती प्रसिद्ध न झाल्यामुळे आणि पवित्र पोर्टलवर संबंधित पदांच्या जाहिराती अपलोड करता न आल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 27, 2026 | 05:37 PM
क्रीडा शिक्षकच नसले तर खेळाडू कसे घडणार? भरती रखडल्याने आमरण उपोषणाला सुरूवात; ४ हजार ८६० पदांची भरती…
Follow Us
Follow Us:

क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने आमरण उपोषण
 ४ हजार ८६० पदांची भरती तातडीने सुरू करण्याची मागणी
पात्र उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी

सोनाजी गाढवे/पुणे: राज्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ४ हजार ८६० विशेष शिक्षक ‘क्रीडा’ पदांची भरती अद्याप सुरू न झाल्याने पात्र उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासन निर्णयानुसार पदांना मंजुरी मिळूनही सेवा शर्ती प्रसिद्ध न झाल्यामुळे आणि पवित्र पोर्टलवर संबंधित पदांच्या जाहिराती अपलोड करता न आल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे. या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी नागेश शहाजी पाटील आणि शुभम अविनाश ताठे यांनी २४ जुलै पासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांनी सांगितले की, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २ जानेवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळांसाठी ४ हजार ८६० विशेष शिक्षक (क्रीडा) पदांना मंजुरी देण्यात आली होती. या पदांची सेवा शर्ती जाहीर करून पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी २७ एप्रिल आणि ८ जुलै २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनेही करण्यात आली होती. त्यावेळी शासनाकडून सेवा शर्ती लवकर प्रसिद्ध करून पहिल्या टप्प्यात भरती सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा केला.

मात्र, पवित्र पोर्टलवर शाळांकडून जाहिराती अपलोड करण्याची २० जुलै २०२६ ही अंतिम मुदत संपल्यानंतरही विशेष शिक्षक (क्रीडा) पदांची सेवा शर्ती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद केंद्रशाळांतील मंजूर पदांची जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध होऊ शकलेली नसून भरती प्रक्रिया आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे आंदोलनकर्त्यानी यावेळी नमूद केले.

वाद अन् एकच खळबळ! संंजूवर अन्याय, अभिषेकवर मेहेरबानी का? कृष्णमाचारी श्रीकांत भडकले, म्हणाले…

दि. २ जानेवारी २०२६ च्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून क्रीडा शिक्षक भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारे सुरू करावी. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयातील क्रीडा शिक्षकांची पदे इतर कोणाच्याही समायोजनाशिवाय केवळ क्रीडा शिक्षकांसाठी राखीव ठेवावीत. आझाद मैदानावरील आंदोलनावेळी दिलेले आश्वासन शासनाने तातडीने पूर्ण करावे.
गणेश वंडोळे,
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ

आंदोलकांच्या मागण्या
राज्यातील बी.पी.एड., एम.पी.एड. तसेच टीएआयटी-२०२५ पात्र उमेदवारांच्या हिताचा विचार करून विशेष शिक्षक (क्रीडा) पदांची सेवा शर्ती तात्काळ प्रसिद्ध करावी, पवित्र पोर्टलवरील जाहिराती अपलोड करण्याची मुदत वाढवावी, जिल्हा परिषद केंद्रशाळांसाठी स्वतंत्र टॅब उपलब्ध करून द्यावा, मंजूर ४ हजार ८६० पदांची जाहिरात त्वरित प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करावी आणि ही भरती पहिल्या टप्प्यात प्राधान्याने पूर्ण करावी, अशा प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.

नव्या युगाची सुरुवात! वैभव सूर्यवंशी ते रोहित-विराट; 7 दिवसांत सचिन तेंडुलकरचे 7 विक्रम मोडले

सर्वाधिक रिक्त जागा या जिल्हात
पुणे – ३०६
रत्नागिरी – २५१
नाशिक – २४४
अहिल्यानगर – २४६
सातारा – १९९
सोलापुर – १९९
छ. संभाजीनगर – १२८
बीड – १६४
जळगाव – १६४
कोल्हापूर – १७१
नांदेड – १७५
नागपूर – १३६
रायगड – २२८
सातारा – २२३

Web Title: Demand to initiate recruitment of 4860 sports teachers hunger strike pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • hunger strike
  • pune news
  • Sports News
  • Teacher

संबंधित बातम्या

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल
1

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक
2

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ  तालुकास्तरावर विजय
3

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ तालुकास्तरावर विजय

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
4

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.