संजू सॅमसन अन् अभिषेक शर्मा (फोटो- सोशल मिडिया)
झिम्बाब्वेविरुद्ध भारताने टी 20 सिरिज जिंकली आहे. या सिरिजमध्ये अभिषेक शर्माने चांगली खेळी केलेली नाही. त्यावरून आता माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांनी संजू सॅमसनवर अन्याय केल्याचा आरोप भारतीय संघ व्यवस्थापनावर केला आहे. त्यांनी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनला दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. संजू सॅमसनला केवळ तीन खराब खेळींमुळे वगळण्यात आले. तर अभिषेक शर्माला खराब कामगिरी करून देखील संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे.
नव्या युगाची सुरुवात! वैभव सूर्यवंशी ते रोहित-विराट; 7 दिवसांत सचिन तेंडुलकरचे 7 विक्रम मोडले
झिम्बाम्ब्वेविरुद्ध अभिषेक शर्मा तीन सामन्यात मिळून केवळ 11 रन्स करून शकला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात त्याने समाधानकारक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. वर्ल्डकप नंतर काही इनिंग सोडल्यास त्याचा इंटरनॅशनल रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. संजू सॅमसन वर्ल्डकपचा हीरो ठरला होता. मग त्याला संधी का नाही मिळत? ज्या प्रकारे अभिषेकला संधी मिळते. अभिषेक अनेक संधी दिल्या जात असताना संजू सॅमसनला का दिल्या जात नाहीत? असा प्रश्न कृष्णमाचारी श्रीकांत यांनी उपस्थित केला आहे.
नुकत्याच झालेल्या झिम्बाम्ब्वेविरुद्धच्या सिरिजमध्ये अभिषेक शर्मा चांगली कामगिरी करू शकला नाही. तीनही सामन्यात मोठा फटका आणि अति घाई केल्याने त्याला आपली विकेट गमवावी लागली. तर आयर्लंड आणि इंग्लंडच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसन चांगली खेळी करू शकला नव्हता. त्यामुळे त्याला पुढील सिरिजमध्ये संधी देण्यात आली नव्हती. त्यावरून आता माजी खेळाडू देखील टीम मॅनेजमेंटवर आरोप, टीका करताना दिसून येत आहेत.
Abhishek Sharma: अभिषेक शर्माची वेदना! माजी कर्णधाराचे द्रवले मन, कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या धावांच्या बाबतीत संघर्ष करत आहे. त्याच्या बॅटमधून येणाऱ्या धावांचा मोठा आकडा जणू अचानक थांबला आहे. २६ जुलै रोजी संपलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने तिन्ही सामन्यात मिळून केवळ ११ धावा केल्या. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली निराशा व्यक्त केली.






