कर्णधार देवदत्त पडीकल (फोटो- ians)
ऑस्ट्रेलिया ‘ए’ संघाविरुद्ध पुदुच्चेरी येथे होणाऱ्या आगामी चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल याच्याकडे इंडिया ‘ए’ संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या महत्त्वाच्या आणि नव्या जबाबदारीवर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
२५ वर्षीय देवदत्त पडिक्कलने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर छाप पाडली आहे. तसेच त्याने नुकत्याच झालेल्या श्रीलंका टेस्ट सिरिजमध्ये चांगली खेळी केली होती. दोन्ही कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. त्याला कर्णधारपदाचा पहिला मोठा अनुभव २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफी हंगामात मिळाला. या हंगामाच्या उत्तरार्धात कर्नाटक संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे सोपवण्यात आले होते.
कर्णधारपदाच्या अनुभवाबद्दल बोलताना पडिक्कल म्हणाला की, गेल्या हंगामात कर्नाटक संघाचे नेतृत्व करताना त्याला खूप काही शिकायला मिळाले. देशांतर्गत क्रिकेटमधील तो अनुभव आता इंडिया ‘ए’ संघाचे नेतृत्व करताना अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारायला मला मनापासून आवडते, असेही त्याने नमूद केले.
IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित
देवदत्त पडिक्कलला इंडिया ‘ए’ संघाचे कर्णधारपद मिळण्यामागे त्याचा रेड-बॉल क्रिकेटमधील अत्यंत बहारदार फॉर्म हे मुख्य कारण ठरले आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पडिक्कल भारतीय संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. या सिरिजमध्ये पडिक्कलने अवघ्या ३ डावांमध्ये १०९.३३ च्या जबरदस्त सरासरीने एकूण ३२८ धावा कुटल्या. यामध्ये दोन शानदार शतकांचा समावेश होता.






