Naushad Khan Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मुंबई क्रिकेटमध्ये नौशाद खान हे नाव माहित नाही असा माणूसच नाही. लोक त्यांना सरफराज खान आणि मुशीर खान या दोन पोरांचा बाप आणि कोच म्हणून ओळखतात.नौशाद खानचं स्वतःचं टीम इंडियात खेळायचं स्वप्न पूर्ण झालं नाही. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ते स्वप्न आपल्या मोठ्या पोरामध्ये, सरफराजमध्ये बघितलं आणि सरफराजने ते खरं करून दाखवलं. आता त्यांचा धाकटा पोरगा मुशीर खान पण त्याच वाटेवर आहे. त्याने नुकतंच मुंबईसाठी खेळताना 35 वर्ष जुना रेकॉर्ड तोडलाय. याच दरम्यान नौशाद खानचा एक ट्रेनिंगचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. Naushad Khan Viral Video:
बापाकडून धडासोशल मीडियावर जो व्हिडीओ फिरतोय त्यात नौशाद खान आपल्या लेकाला, मुशीरला बॅटिंग शिकवताना दिसताहेत. ते म्हणताहेत, “जेव्हा तू मिडियम पेसरला खेळतो, तो साईड आर्म बॉलर असतो… साईड आर्मने जेव्हा बॉल येतो, तेव्हा तू खूप आधी पोझिशन घेतली पाहिजे. त्यामुळे तुला एक्स्ट्रा टाइम मिळतो. इथे तुला फ्रंटफूटवर जाता येणार नाही. मिडियम पेसरला फक्त मनगट फिरवायचं असतं.”ऐकायला सोपं वाटतं, पण यामागे किती वर्षांची मेहनत आहे ते त्या व्हिडीओत दिसतं. एक बाप आपल्या पोराला एक एक बारीक गोष्ट समजावून सांगतोय.
View this post on Instagram
मुशीरने नुकतंच रणजी ट्रॉफीत जे केलं त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. हरियाणाविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने आधी सेंच्युरी मारली आणि नंतर बॉलिंग करताना 6 विकेट पण घेतल्या.असं करणारा तो मुंबईचा सहावा खेळाडू ठरलाय. एकाच रणजी मॅचमध्ये शंभर रन आणि 5 पेक्षा जास्त विकेट घेणं सोपं नाही. याच्या आधी हे काम खुद्द रवी शास्त्री यांनी 1990 साली केलं होतं. म्हणजे 35 वर्षांनंतर मुशीरने तोच रेकॉर्ड मोडला आहे. आता तर तो थेट टीम इंडियाचे दरवाजे ठोठावतोय.
Cricket News: प्रियांश राठोडची फटकेबाजी, विहान बोकरियाचा विकेट्सचा चौकार; सीएनए अंतिम फेरीत
नौशाद खानने आपल्या दोन्ही पोरांना मुंबईच्या आझाद मैदानावर घडवलं आहे. तिथे ऊन असो, पाऊस असो, त्यांनी रोज कडक शिस्तीत प्रॅक्टिस करून घेतली. खायला प्यायला काही नसायचं, खूप खडतर दिवस काढले. पण बापाने हार मानली नाही.सरफराजला जेव्हा पहिल्यांदा टीम इंडियाची टेस्ट कॅप मिळाली, तेव्हा मैदानावर उभे असलेले नौशाद खान रडले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण ते अश्रू फक्त आनंदाचे नव्हते, तर वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीचे होते.
View this post on Instagram
आज सरफराज टीम इंडियात आहे, मुशीर रणजी गाजवतोय. पण या दोघांच्या मागे उभा असलेला खरा माणूस म्हणजे नौशाद खान. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये पोरांना घेऊन जाणारा, दिवसभर त्यांना थ्रो देणारा तो बाप आज खऱ्या अर्थाने जिंकलाय.






