
DSP cricket league
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावरील पहिल्या सामन्यात अभिनव त्यागी (१५३ धावा), आरव गिनी (१२६ धावा व २-१८), मितांशू मंडल ५-२४) यांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर पुणे क्रिकेट क्लब संघाने रायझिंग चॅलेंजर बॉईज संघाचा ४२१ धावांनी धुव्वा उडवत आगेकूच कायम ठेवली. दुसऱ्या सामन्यात असित देशपांडे (१०३धावा) याने केलेल्या शतकी खेळीसह ऋग्वेद बांगर (५-२०) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पूना क्लब संघाने अंकित बावणे क्रिकेट अकादमी संघाचा १८५ धावांनी पराभव केला.
DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला
निकाल : साखळी फेरी
पूना क्लब: ५० षटकात ७ बाद २८६ धावा (असित देशपांडे १०३ (१०७, १६×४), सचिन बोरा ८६ (१२३, ११×४), वेदांत पायगुडे नाबाद २४, विहान ताकवले १३, मितांश देशमुख ४-४८) वि. वि. अंकित बावणे क्रिकेट अकादमी : १९.२ षटकात सर्वबाद १०१ धावा (संस्कार फटे नाबाद ५२ (२७, ९×४, १×६), सिद्धार्थ चंद्र १०, ऋग्वेद बांगर ५-२०, स्वराज बनसोडे ३-१३); सामनावीर – ऋग्वेद बांगर.
पुणे क्रिकेट क्लब: ४० षटकात ९ बाद ४७७ धावा (अभिनव त्यागी १५३ (४३,१३×४, १५×६), आरव गिनी १२६ (८३, १८×४, १×६), मितांशू मंडल ५६ (५३, ७×४), हर्ष पाष्टे ४८ (२३, ८×४, २×६), अमरेंद्र यादव २७, विवेक कुमार ३-८३, कार्तिक वडगुळे २-५९) वि. वि. रायझिंग चॅलेंजर बॉईज : १५.४ षटकात सर्वबाद ५६ धावा (अथर्व पाटील ८, राजवीर दिगंबर ७, मितांशू मंडल ५-२४, आरव गिनी २-१८, वेदांत शेळके २-११); सामनावीर – आरव गिनी.
DSP Trophy Cricket: ‘डीएसपी करंडक’ स्पर्धेत रंगला थरार! पुणे क्रिकेट क्लब अन् सार्क अकादमीची आगेकूच
डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सच्या वतीने आयोजितपहिल्या डीएसपी करंडक १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतसाखळी फेरीत सार्क क्रिकेट अकादमी आणि पुणे क्रिकेट क्लब या संघांनी दमदार कामगिरी करत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी आगेकूच केली.