Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 वर निवडणुकीचे सावट! पाच राज्यांतील मतदानामुळे BCCI वेळापत्रक बदलणार?

5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. ९ एप्रिलला आसाममध्ये मतदान असल्याने गुवाहाटीतील सामन्यांवर परिणाम होऊ शकतो.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 15, 2026 | 09:56 PM
IPL 2026 वर निवडणुकीचे सावट! पाच राज्यांतील मतदानामुळे BCCI वेळापत्रक बदलणार? (Photo Credit-AI)

IPL 2026 वर निवडणुकीचे सावट! पाच राज्यांतील मतदानामुळे BCCI वेळापत्रक बदलणार? (Photo Credit-AI)

Follow Us
Follow Us:

 

  • IPL 2026 वर निवडणुकीचे सावट!
  • पाच राज्यांतील मतदानामुळे BCCI वेळापत्रक बदलणार?
  • 7 आणि 10 एप्रिलच्या सामन्यांवर टांगती तलवार!
निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या घोषणांनंतर क्रीडा विश्वात एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या (IPL 2026) वेळापत्रकाची. पाच राज्यांतील निवडणुका लक्षात घेऊन बीसीसीआयने (BCCI) यापूर्वी केवळ 12 एप्रिलपर्यंतचे (पहिले 20 सामने) वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, आता मतदानाच्या प्रत्यक्ष तारखा समोर आल्यानंतर या वेळापत्रकात फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

आसाममधील मतदानाचा गुवाहाटीतील सामन्यांना फटका?

निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, आसाममधील 126 विधानसभा जागांसाठी 9 एप्रिल 2026 रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दुसरीकडे, आयपीएलच्या वेळापत्रकानुसार आसामची राजधानी गुवाहाटी येथे 7 एप्रिल रोजी महत्त्वाचा सामना नियोजित आहे. मतदानासाठी लागणारी सुरक्षा व्यवस्था आणि आयपीएलची सुरक्षा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सचे तीन सामने

आसाममधील गुवाहाटी येथील बारासपारा क्रिकेट स्टेडियम हे राजस्थान रॉयल्सचे दुसरे ‘होम ग्राऊंड’ आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या सुरुवातीच्या वेळापत्रकात येथे तीन सामने होणार आहेत:

  • 30 मार्च: राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
  • 7 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 10 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे तिन्ही सामने सायंकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहेत.

IPL च्या इतिहासात सर्वात जास्त षटकार मारणारे टॉप 10 खेळाडू; युवराज सिंगच नाही तर गौतम गंभीरचाही यादीत समावेश

7 आणि 10 एप्रिलच्या सामन्यांवर टांगती तलवार!

9 एप्रिलला मतदान असल्याने दोन दिवस आधी म्हणजेच 7 एप्रिलपासूनच निवडणूक प्रचार थांबवला जातो आणि सुरक्षा व्यवस्था कडक केली जाते. संपूर्ण पोलीस दल आणि प्रशासन मतदानाची तयारी आणि बुथ व्यवस्थापनात व्यस्त असते. अशातच 7 एप्रिलच्या संध्याकाळी सामना आयोजित करणे आणि पुन्हा मतदान संपल्यानंतर लगेच 10 एप्रिलला दुसरा सामना खेळवणे, ही पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.

सुरक्षा व्यवस्थेचे मोठे आव्हान

निवडणुकीच्या काळात सुरक्षा दलांवर अनेक जबाबदाऱ्या असतात, जसे की:

  • EVM सुरक्षितता: मतदान केंद्रांपर्यंत ईव्हीएम मशीन पोहोचवणे आणि त्यांची सुरक्षा करणे.
  • सीमा सुरक्षा: आसामची सीमा बांगलादेशला लागून असल्याने संवेदनशील भागात अधिक बंदोबस्त ठेवावा लागतो.
  • व्हीआयपी सुरक्षा: खेळाडू, संघ कर्मचारी आणि हजारो प्रेक्षकांची 24 तास सुरक्षा सुनिश्चित करणे निवडणूक काळात कठीण जाते.

बीसीसीआयचा ‘प्लॅन बी’ काय?

असे मानले जात आहे की, बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी प्राथमिक चर्चा केली असेल. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत पोलीस दलाची उपलब्धता हा कळीचा मुद्दा ठरतो. जर आसाम सरकारने असमर्थता दर्शवली, तर गुवाहाटीतील सामन्यांच्या तारखा बदलल्या जाऊ शकतात किंवा हे सामने दुसऱ्या शहरात हलवले जाऊ शकतात. बीसीसीआय लवकरच आयपीएल 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करणार असून, त्यात गुवाहाटी आणि इतर निवडणूक राज्यांतील सामन्यांबाबत अधिक स्पष्टता मिळेल.

जय शहाने सूर्या आणि गंभीरला दिले मोठे लक्ष्य, कर्णधार आणि प्रशिक्षक अपेक्षा पूर्ण करतील का?

Web Title: Election shadow over ipl 2026 will the bcci reschedule due to voting in five states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • Assembly Election
  • bcci
  • Election Commision
  • IPL 2026

संबंधित बातम्या

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
1

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध
2

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
3

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
4

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.