रिंकू सिंगच्या नावे दिवाळी फटाके(फोटो-सोशल मीडिया)
Diwali crackers in the name of Rinku Singh : देशभर आता दिवाळीचा उत्सव साजरा केला जात आहे. जनता दिवाळीची खरेदी करत असताना त्यात प्रमुख्याने फटाके खरेदी करताना दिसत आहे. अशातच अलीगडमधील प्रदर्शन मैदानावरील तात्पुरत्या फटाक्याच्या बाजारात स्टार भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि ऑपरेशन सिंदूर यांच्या प्रतिमा असलेल्या फटाक्यांची गर्दी दिसू लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये किंमती वाढल्या असल्या तरी, बाजारात खरेदीचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसत आहे. स्थानिक प्रशासनाकडून फटाक्यांच्या विक्रीसाठी २५० तात्पुरते परवाने जारी करण्यात आले आहेत.
बाजार हिरव्या फटाक्यांनी भरलेला दिसत असला तरी सर्वात जास्त मागणी असलेले ऑपरेशन सिंदूर आहेत. लोक हे खास फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. मुलांसह कुटुंबे देखील बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. हे बाजार केवळ फटाके खरेदीचे केंद्र बनले नसून नवीन डिझाइन आणि रंगीबेरंगी फटाक्यांची निवड देखील दिसत आहे. अशाप्रकारे, अलीगडमधील दिवाळीची तयारी संपत येत आहे.
फटाके विक्रेते असणारे सचिन सागर म्हणाले की, “आपल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला असून या सन्मानार्थ, ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचा फटाका बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे. ज्याला आता प्रचंड मागणी अस्लयचे दिसत आहे. या फटाक्याची किंमत ₹३,२०० आहे आणि त्यात २४० शॉट्स आहेत.”
तसेच दुसरे एक फटाके विक्रेते अंकुश म्हणाले की, “भारतीय सैन्याने युद्धभूमीवर पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर, ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचा फटाका बाजारात आला आहे. रिंकू सिंग नावाचा फटाका देखील बाजारात आला आहे. माझ्याकडे विविध प्रकारचे फटाके आहेत जे यावेळी लोकांचे पूर्णपणे मनोरंजन करणार आहेत. यावेळी किंमतींमध्ये थोडा फरक आहे.”
हेही वाचा : IND vs AUS : ‘हिटमॅन’ची बॅट रचणार विक्रम! Rohit Sharma ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीमापार करेल प्रत्येक चेंडू अन्…
फटाके खरेदी करण्यासाठी बाजारात आलेल्या नव्या सक्सेना म्हणाल्या की, “मी विविध प्रकारचे फटाके खरेदी केले असून मला खरोखरच स्काय शॉट खूप आवडतो. खबरदारी म्हणून, आमची वाहने दूर पार्क करण्यात आली आहेत. आम्ही येथील व्यवस्थेबद्दल खूप आनंदी आहोत.” असे त्यांनी सांगितले.