ब्रिटनच्या नागरिकांनाही मिळणार आधारकार्ड? पंतप्रधान स्टारमर यांनी मांडली ब्रिट कार्डची योजना (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
UK Digital Identification Plan : लंडन : नुकतेच ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान कीयर स्टारमर (Keir Starmer) भारताच्या दौऱ्यावर आले होते. या भेटीत त्यांनी भारत-ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार, आणि इतर क्षेत्रातील संबंधावर चर्चा केली.
दक्षिण चीन समुद्रात पुन्हा तणाव! ड्रॅगनच्या लढाऊ विमान अन् जहाजांचा तैवानच्या सीमेत प्रवेश
तसेच त्यांनी भारताच्या आधार डिजिटल बायमेट्रीक योजनेचे कौतुकही केली. स्टारमर यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि आधार योजेनचे प्रमुख नंदन किलेकारी यांची भेट देखील घेतली. त्यांनी भारतात डिजिटल योजना प्रणाली कशी पद्धतीने लागू झाली, त्याचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला यावर सविस्तर चर्चा केली.
यावरुन त्यांनी ब्रिटनमध्ये नव्या ब्रिट कार्ड योजनेसाठी ही योजना उपयुक्त ठरु शकते असे म्हटले. भारताच्या आधार कार्डच्या मदतीने नागरिकांना सरकारी योजना, बॅंकिंग सेवा आणि इतर सुविधा सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात. अशीच प्रणाली ब्रिटनमध्येही सुरु करण्याचा उद्देश ब्रिटनचे पंतप्रधान कीयर स्टारमर यांनी आखली आहे.
भारतात आधार प्रणालीवर नागरिकांना सरकारी योजना आणि सेवा दिल्या जातात. पण बायमेट्रिकमुळे फ्रॉडचे अनेक प्रकार घडले आहे. यामुळे कीयर स्टारमर यांनी ब्रिटनचे ब्रिट कार्ड हे भारतापेक्षा वेगळे असेल असे स्पट केले आहे. त्यांनी म्हटले की, ब्रिटनचे ब्रिट कार्डसाठी लोकांच्या बायोमेट्रिक म्हणजे लोकांच्या हाताचे ठसे, किंवा डोळ्यांचे स्कॅन यांसारखी माहिती नसणार. डेटा सुरक्षा आणि गोपनीयता ठेवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ठ असेल.
सुरुवातीला हे कार्ड केवळ रोजगासाराठी दिले जाईल, ज्यामुळे अवैध कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येईल असे स्टारमर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर ही प्रणाली केवळ सरकारी सेवांसाठीच वापरता येईल असेही स्टारमर यांनी सांगितले आहे.
सध्या पंतप्रधान स्टारमर यांच्या योजनेला मोठा विरोध होत आहे. नागरिक आणि काही तज्ज्ञांच्या मते, डिजिटल आयडीमुळे त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण वाढले. यामुळे त्यांची खाजगी माहिती धोक्यात येऊ शकते. परंतु स्टारमर यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, यामुळे योग्य नियोजन आणि सरकारच्या पारदर्शक धोरणांना फायदा होईल. ब्रिटन आपली स्वतंत्र आणि सुरक्षित डिजिटल ओळख उभारेल, ज्यामुळे त्यांच्या सरकार आणि कामगार व्यवस्थेत सुधारणा येईल.
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा फोडला टॅरिफ बॉम्ब! २५% कर लागू केल्याने ‘या’ क्षेत्रांना बसणार फटका