ज्वाला गुट्टा(फोटो-सोशल मोडिया)
भारताची माजी स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा गेल्या एप्रिल महिन्यात आई झाली असून तिने मुलीला जन्म दिला आहे. आई झाल्यापासून ती या उपक्रमात सहभागी झाली आहे. ज्वाला गुट्टा तिचे आईचे दूध एका सरकारी रुग्णालयात ब्रेस्ट मिल्क काढून दान देत आहे. आतापर्यंत तिच्याकडून ३० लिटर आईचे दूध दान करण्यात आले आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025: ‘भारताने विजेतेपद जिंकल्यास…’, सूर्यकुमार यादव ACC अध्यक्ष मोहसीन नकवीकडून घेणार नाही ट्रॉफी
गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये ज्वाला गुट्टाकडून तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यामध्ये ज्वालाने या उपक्रमाबाबत माहिती शेअर केली होती. तसेच तिने लोकांना या उपक्रमामध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले होते. ज्वाला गुट्टाने काही फोटो देखील शेअर केले आणि लिहिले की, “स्तनाचे दूध हे जीव वाचवते. अकाली जन्मलेल्या आणि आजारी बाळांसाठी, दान करण्यात आलेले दूध जीवन बदलणारे ठरू शकते. जर तुम्हाला दान करणे शक्य असेल तर तुम्ही गरजू कुटुंबासाठी हीरो बनू शकतात. याबाबत अधिक जाणून घ्या, माहिती शेअर करा आणि दूध बँकांना पाठिंबा द्या.”
हेही वाचा : Bangladesh Vs Afghanistan: अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशने मारली बाजी, अफगाणिस्तानची लढाई पडली अपुरी
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ज्वालाकडून आतापर्यंत अकाली जन्म झालेल्या किंवा आजारी असलेल्या बाळांना मदत करण्यासाठी ३० लिटर स्तनाचे दूध दान करण्यात आले आहे. वृत्तानुसार, ज्वाला गुट्टा ही गेल्या चार महिन्यांपासून सतत तिचे स्तनाचे दूध दान करत आहे.






