
vasim jafar on virat kohli
विराट कोहलीने बीसीसीआय आणि निवड समितीसंबंधित नाराजीनाट्य सुरू असल्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. जाफरने अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, त्यांनी कोहलीसारख्या महान खेळाडूला योग्य वागणूक दिली नाही.
Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा
वसीम जाफरच्या प्रतिक्रियेनुसार, कोहलीसारख्या श्रेष्ठ खेळाडूला अधिक सन्मान मिळायला हवा होता. , कोहली केवळ एक उत्कृष्ट फलंदाजच नाही, तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना मैदानाकडे आकर्षित करण्याची ताकद त्याच्यात आहे. मात्र, त्याच्यासोबत ज्या प्रकारे व्यवहार करण्यात आला, त्यामुळे तो काहीसा नाराज असावा. त्याच्यासोबत खूप चुकीचे घडले. विराट कोहली याबाबत स्वतः बोलत नाही टॉवर यावर स्पष्टता येणार नाही.
विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली वेस्टइंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे. २७ सप्टेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी कोहलीने पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबतही एक मोठे विधान केले आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी आपण आपले सर्वस्व पणाला लावू, असेही कोहलीने म्हटले आहे.