आसामचे चार क्रिकेटपटू निलंबित(फोटो-सोशल मीडिया)
Four cricketers from Assam suspended : भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा देखील सहभाग आहे. दरम्यान आसाम क्रिकेट असोसिएशनकडून (एसीए) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ दरम्यान भ्रष्टाचारात सहभागी असल्याच्या आरोपाखाली चार क्रिकेटपटूंना निलंबित करण्यात आले आहे. नेमकं प्रकरण काय याबाबत आपण जाऊन घेऊया.
हेही वाचा : Under-19 Asia Cup: वैभवच्या विक्रमी शतकामुळे भारताने UAE ला लोळवले! 234 धावांनी मिळवला विजय
निलंबित करण्यात आलेल्या या खेळाडूंनी विविध टप्प्यांवर आसामचे प्रतिनिधित्व केलेले होते. आता त्यांच्याविरुद्ध राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या खेळाडूंवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या काही आसाम खेळाडूंना प्रभावित करण्याचा आणि भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आले आहे. एसीएचे सचिव सनातन दास यांनी सांगीतले की, “आरोपांनंतर, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा युनिट (एसीएसयू) ने चौकशी केली असून एसीएनेही फौजदारी कारवाई सुरू केली आहे. प्रथमदर्शनी, खेळाच्या अखंडतेवर परिणाम करणारे गंभीर गैरवर्तनाचे संकेत आहेत.” निलंबित करण्यात आलेल्या खेळाडुंमध्ये अमित सिन्हा, इशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकूर यांचा समावेश आहे.
आसामचे सय्यद मुश्ताक लीग सामने २६ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान लखनौमध्ये खेळले गेले आहे. परंतु, ते सध्या सुरू असलेल्या सुपर लीग टप्प्यासाठी पात्र ठरू शकले नाहीत. दास पुढे म्हणाले की, “परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता टाळली जावई यासाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशीचा अंतिम निकाल येईपर्यंत किंवा असोसिएशनकडून पुढील निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत हे निलंबन लागू राहणार आहे.”
निलंबनाच्या कालावधीत, या खेळाडूंना एसीए, त्यांच्या जिल्हा युनिट्स किंवा संलग्न क्लबद्वारे आयोजित कोणत्याही राज्यस्तरीय स्पर्धेत किंवा सामन्यात भाग घेण्यास मनाई असणार आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना मॅच रेफरी, प्रशिक्षक, पंच इत्यादींसह कोणत्याही क्रिकेटशी संबंधित क्रियाकलापांमध्ये भाग घेता येणार नाही. सनातन दास पुढे म्हणाले की, सर्व जिल्हा संघटनांना आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि त्यांच्या अधिकारक्षेत्रातील क्लब आणि अकादमींना एसीएच्या निर्णयाची माहिती देण्याचे निर्देश दिले गेले आहेत.






