नागपूरमध्ये बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी महत्त्वाची राजकीय भूमिका स्पष्ट केली. आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे लढण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शतायुष्याच्या शुभेच्छा देत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे आम्ही भाग्यवान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर मिटकरी म्हणाले की, दिल्लीत झालेला कार्यक्रम हा स्नेहभोजनाचा असून तो राजकीय कार्यक्रम नव्हता. पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय स्वतः शरद पवार आणि अजित पवार घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक आमदार विकास निधीबाबत त्यांनी सांगितले की विरोधी आमदारांनाही निधी मिळतो; तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निधीसंदर्भात आवश्यक निर्णय घेतील. आगामी निवडणुकांसाठी महायुती एकत्र असल्याचा त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.