ICC आणि JioStar यांच्यात करार कायम(फोटो-सोशल मीडिया)
The agreement between ICC and JioStar remains in effect : जिओस्टार विश्वचषक सामने प्रसारित करणार नाही अशा बातम्या समोर येत होत्या. या निर्णयामागील आर्थिक तोटा हे कारण असल्याचे म्हटले जात होते. तथापि, जिओस्टारनकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले आहे की, ते आयसीसीसोबतचा करार कायम ठेवणार आहेत. आयसीसी टी२० विश्वचषक सुरू होण्यास अवघ्या ६० दिवसांपेक्षा कमी वेळ बाकी असताना भारताच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
मीडिया कंपनी जिओस्टारने स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसोबत असलेल्या त्यांच्या विद्यमान प्रसारण कराराचे पूर्णपणे पालन करण्यास ते वचनबद्ध आहेत. २०२६ च्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकापूर्वी अंदाजे ३ अब्ज डॉलर्सच्या करारातून माघार घेण्याचा विचार करत करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला गेला होता.
हेही वाचा : BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार
रिलायन्सच्या मीडिया व्यवसाय आणि जागतिक दिग्गज वॉल्ट डिस्नेच्या भारतातील व्यवसायाच्या विलीनीकरणातून स्थापन करण्यात आलेल्या जिओस्टारने एका अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे की दोन्ही संस्था भारतातील चाहत्यांना आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकासारख्या आगामी आयसीसी कार्यक्रमांसाठी सर्वोत्तम आणि अखंडित प्रसारण प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे काम करत आहेत, जेणेकरून प्रेक्षकांना कोणत्याही प्रसारण तक्रारींना समोर जाऊ लागू नये.
कंपनीकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्व कार्यक्रमांची तयारी नियोजनानुसार सुरू असून प्रेक्षक, जाहिरातदार किंवा इतर कोणत्याही उद्योग भागीदारांवर कोणताही परिणाम होणार नाही. निवेदनामध्ये म्हटले आहे की, दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारीचा भाग म्हणून आयसीसी आणि जिओस्टार नियमितपणे ऑपरेशनल, व्यावसायिक आणि धोरणात्मक मुद्द्यांवर संवाद साधतात जेणेकरून त्यांची भागीदारी खेळाच्या विकासात प्रभावी काम करेल.
हेही वाचा : अबब! T20 क्रिकेटमध्ये ठोकले द्विशतक; 23 षटकारांची आतिषबाजी करत फलंदाजाने विरोधी संघाला केले उद्ध्वस्त
दिशाभूल करणारे अहवाल
जियोस्टारने अलीकडील मीडिया रिपोर्ट्सना “दिशाभूल करणारे” अहवाल असे म्हटले आहे. तसेच ते दोन्ही संघटनांची खरी भूमिका प्रतिबिंबित करत नाहीत असे देखील म्हटले आहे. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, सध्याचा करार पूर्णपणे लागू असून जियोस्टार भारतात आयसीसीचा अधिकृत मीडिया पार्टनर आहे. जियोस्टार करारातून माघार घेत असल्याचा करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. आयसीसीने जियोस्टारच्या विधानाला दुजोरा देणारे एक वेगळे निवेदन देखील प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की दोघांमधील विद्यमान करार कायम आहे आणि त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.






