सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (फोटो- सोशल मीडिया)
चारही विद्याशाखांचे अधिष्ठातापद गेली तीन वर्षे रिक्त
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालकपदही रिक्त
अधिष्ठाता व परीक्षा नियंत्रक पदभरत लांबणीवर
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) चारही विद्याशाखांचे अधिष्ठातापद गेली तीन वर्षे रिक्त आहे. याशिवाय काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालकपदही रिक्त झाले आहे. या महत्त्वाच्या पदांच्या भरतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने (Pune News) जाहिरात प्रसिद्ध करून १२ डिसेंबरपर्यंत अर्ज मागवले होते. मात्र आता अर्ज सादर करण्यासाठीची मुदत २८ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीबरोबरच अधिष्ठाता व परीक्षा नियंत्रक पदभरतीही लांबणीवर गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी पदभार सोडल्यानंतर त्या पदाची जबाबदारी प्रभारी स्वरूपात डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे देण्यात आली. परीक्षा विभाग हे विद्यापीठाच्या कार्यपद्धतीतील अत्यंत महत्त्वाचे अंग असल्याने येथेही कायमस्वरूपी संचालकाची नियुक्ती होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
पुणे विद्यापीठात शिक्षक पदासाठी जागा खाली! इच्छुकांनो… संधीचे सोने करा
या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने अधिष्ठाता व परीक्षा संचालक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. इच्छुक उमेदवारांना १२ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत वाढवून २८ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे या पदांच्या नियुक्ती प्रक्रियेला आणखी विलंब लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विद्यापीठातील महत्त्वाच्या पदांवर दीर्घकाळ प्रभारी व्यवस्था सुरू राहिल्याने निर्णयप्रक्रिया आणि प्रशासनावर परिणाम होत असल्याची भावना प्राध्यापक व शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करून पूर्णवेळ नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुणे विद्यापीठात शिक्षक पदासाठी जागा खाली
पुणे विद्यापीठामध्ये काम करू पाहणाऱ्या इच्छुकांसाठी ही महत्वाची भरती आहे. शिक्षक पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. पुण्याच्या सावित्राईबाई फुले महाविद्यापीठासंबंधित असणाऱ्या या भरतीसाठी राज्यभरातून उमेदवार इच्छुक आहेत तसेच मोठ्या प्रमाणावर अर्जही मागवण्यात येत आहे. जर तुम्ही अद्याप अर्ज केला नाही तर टेन्शन नॉट! अद्याप अर्ज करण्याची संधी गेली नाही.
पक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक ही भरती मागवण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १११ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या अर्जात काही त्रुटी असतील तर त्याही याकाळात सुधारता येणार आहे अशी महत्वाची नोंद घेण्यात यावी.






