
आज आरसीबी विरुद्ध गुजरातमध्ये होणार महामुकाबला
अहमदाबादच्या स्टेडियमवर आयपीएल 2026 चा अंतिम सामना
फायनलआधी व्हायरल झाले मजेशीर व्हिडिओ
Tata IPL 2026 GT Vs RCB Final in Ahmedabad: आज आयपीएल 2026 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम होणार आहे. आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार आहेत. संध्याकाळी 7.3 वाजता हा सामना सुरू होणार आहे. मात्र अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सामन्याची गमंत वाढली आहे.
आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. आज आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. पीच रिपोर्टनुसार हा सामना हाय स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे. मात्र आजच्या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. मात्र त्याआधी काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
‘आरसीबी जिंकल्यास टक्कल करेन’
If RCB lifts the trophy, I would go Bald Ee Sala Cup Namdu???#viratkohli #ipl #rcb pic.twitter.com/X693Mpowaz — Chapla (@ChaplaDaSun) May 31, 2026
‘आरसीबी पुन्हा इतिहास बदलण्याच्या तयारीत’
एक बार फिर से इतिहास दोहराएगी RBC….🥳🥳….!!#RCBvsGT#IPL pic.twitter.com/bkKzVgWlm3 — Hari (@harishankarBya6) May 31, 2026
‘प्रिन्स विरुद्ध किंग’
THE FINAL RCB VS GT 💀
WHO WILL WIN THE MATCH #IPL #RCBVSGT pic.twitter.com/rJgHQluJ6j — IPLwithMayank (@MAYXxFF) May 31, 2026
2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि 2025 मध्ये आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आज दुसऱ्यांदा ट्रॉफी नावावर करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. रजत पाटीदार आणि शुभमन गिल अनुक्रमे आरसीबी आणि गुजरातचे नेतृत्व करत आहे. क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीने गुजरातचा पराभव केला होता. त्यामुळे गुजरातचा संघ बदला घेण्यासाठी उत्सुक असेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, जेकब डफी
गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा