मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई! (Photo Credit- X)
कस्टम्स अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयास्पद हालचाली आणि ‘एपीआयएस’ (APIS) प्रोफाइलिंगच्या आधारे तपासणी केली असता हायड्रोपोनिक वीड तस्करीची चार प्रकरणे उघडकीस आली. हे अंमली पदार्थ बँकॉकमधून आलेल्या पाच प्रवाशांकडून हस्तगत करण्यात आले. या प्रवाशांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act, 1985) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
Between 03.03.2026 and 10.03.2026, Mumbai Customs Zone–III (Airport) effected significant seizures including 12.530 kgs of suspected NDPS (Hydroponic Weed), valued at approximately Rs. 12.530 crores in the illicit market and 409 grams Gold valued at Rs. 49.9 lacs.
06 passengers… pic.twitter.com/kLPNNXmlCo — Mumbai Customs-III (@mumbaicus3) March 10, 2026
अंमली पदार्थांसोबतच सोन्याच्या तस्करीचे तीन प्रयत्नही कस्टम्सने उधळून लावले आहेत. वेगवेगळ्या तीन प्रकरणांमध्ये प्रवाशांकडून ४०९ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले, ज्याची किंमत सुमारे ५९.५७ लाख रुपये आहे. हे सोने बेकायदेशीरपणे लपवून आणले जात होते. याप्रकरणी सीमा शुल्क कायदा (Customs Act) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या एका खात्रीशीर माहितीवरून अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून आलेल्या आणखी एका प्रवाशाला अडवले. त्याच्या झडतीमध्ये ४९९ ग्रॅम हायड्रोपोनिक वीड सापडले, ज्याची किंमत सुमारे ४९.९ लाख रुपये आहे. या प्रवाशालाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई कस्टम्स झोन-३ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या यशस्वी कारवाईमागे आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटा अॅनालिटिक्सचा मोठा वाटा आहे. प्रवाशांची अचूक प्रोफाइलिंग आणि स्पॉट तपासणीमुळे संशयास्पद हालचाली वेळेत ओळखणे शक्य झाले. आगामी काळात तस्करी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि तांत्रिक सक्षमीकरण यावर अधिक भर दिला जाणार असल्याचेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबईत सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ; डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी अधिकारी टार्गेट






