Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता थांबायचं नाही! Olympic 2036 साठी भारताचा ‘मास्टर प्लॅन’; हॉकीचा चेहरामोहरा बदलणार

प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळावा यासाठी मागील ३ ते ४ वर्षांपासून त्यांना नेदरलँड्ससारख्या हॉकीतील आघाडीच्या देशांमध्ये प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक दौऱ्यांसाठी पाठविण्यात येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 22, 2026 | 03:18 PM
आता थांबायचं नाही! Olympic 2036 साठी भारताचा ‘मास्टर प्लॅन’; हॉकीचा चेहरामोहरा बदलणार
Follow Us
Follow Us:

हॉकी इंडिया लीगमुळे वाढतोय सामन्यांचा अनुभव
प्रतिभा शोध, चाचणी, ६.२० लाखांची शिष्यवृत्ती
१० एनसीओई केंद्रे आणि निवडक खेळाडूंना वार्षिक ६.२० लाखांची शिष्यवृत्ती

असित मंडल/पुणे: भारतात २०३६ मधील ऑलिम्पिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन आणि ऐतिहासिक पदकांचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून केंद्रीय क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि हॉकी इंडियाने तळागाळापासून व्यापक तयारी सुरू केली आहे. ग्रासरूट स्तरापासून वरिष्ठ राष्ट्रीय संघापर्यंत प्रतिभावान खेळाडू घडविण्यासाठी भक्कम आणि वैज्ञानिक व्यवस्था उभारण्यावर भर दिला जात आहे.
पुण्यात सुरू असलेल्या १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान प्रतिभा शोध मोहिमेसाठी आलेले भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक आणि विद्यमान हाय परफॉर्मन्स डायरेक्टर पीयूष दुबे यांनी दैनिक नवभारतचे प्रतिनिधी असित मंडल यांच्याशी खास बातचीत करत भारताला पुन्हा हॉकीतील जागतिक महासत्ता बनविण्याच्या या महत्त्वाकांक्षी आराखड्याची सविस्तर माहिती दिली.

तळागाळापासून एलिट स्तरापर्यंत भक्कम व्यवस्था
टोकियो ऑलिम्पिकमध्ये तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाला पदक मिळवून देणाऱ्या प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या पीयूष दुबे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०३६ ऑलिम्पिक व्हिजनच्या पार्श्वभूमीवर ‘खेलो इंडिया’ अंतर्गत सुमारे ३६ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीद्वारे क्रीडा पायाभूत सुविधा आणि खेळाडूंच्या विकासावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. देशभरात १० राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे अर्थात एनसीओई, भारतीय क्रीडा प्राधिकरणाची प्रशिक्षण केंद्रे आणि सुमारे १०० खेलो इंडिया केंद्रे कार्यरत आहेत.

Hockey India स्पर्धेत ‘या’ चार संघाची सेमीफायनलमध्ये धडक; पिंपरीत पाहायला मिळतोय हॉकीचा संग्राम

प्रतिभा शोध, चाचणी, ६.२० लाखांची शिष्यवृत्ती
पीयूष दुबे यांनी स्पष्ट केले की, निवडीसाठी कोणतीही निश्चित संख्या ठेवण्यात आलेली नाही. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आणि गुणवत्ता दिसेल, त्याला संधी दिली जाईल. अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंना खेलो इंडिया अंतर्गत दरवर्षी ६.२० लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये १.२० लाख रुपये थेट आर्थिक स्वरूपात, तर ५ लाख रुपयांचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, निवास आणि क्रीडा उपकरणे यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय अनुभवातून घडत आहेत नवे स्टार
प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळावा यासाठी मागील ३ ते ४ वर्षांपासून त्यांना नेदरलँड्ससारख्या हॉकीतील आघाडीच्या देशांमध्ये प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक दौऱ्यांसाठी पाठविण्यात येत आहे. या व्यवस्थेचा परिणाम आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून येत असल्याचे दुबे यांनी सांगितले.वरिष्ठ विश्वचषकात खेळलेल्या भारतीय महिला संघातील १२ आणि पुरुष संघातील ७ खेळाडू खेलो इंडिया आणि एनसीओई व्यवस्थेतून पुढे आले आहेत. तसेच आगामी कनिष्ठ आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या १८ सदस्यीय संपूर्ण संघातील खेळाडूही याच प्रशिक्षण केंद्रांमधून घडले आहेत. हरियाणाची साक्षी राणा, ओडिशाची सुनेलिता टोप्पो, मिझोरमची लालथ्वांगी यांसारख्या खेळाडूंनी या व्यवस्थेतून प्रगती केली आहे.

Hockey World Cup मध्ये Team India चा नेदरलँड्सकडून दारुण पराभव, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी…

हॉकी इंडिया लीगमुळे वाढतोय सामन्यांचा अनुभव
युवा आणि उदयोन्मुख खेळाडूंना अधिकाधिक सामन्यांचा अनुभव मिळावा यासाठी पुनरुज्जीवित हॉकी इंडिया लीग आणि वर्षभर विविध स्तरांवर होणाऱ्या अस्मिता लीग महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या स्पर्धांमुळे खेळाडूंचा सामन्यातील संयम, दबावाखाली खेळण्याची क्षमता आणि ‘मॅच टेम्परामेंट’ विकसित होत असल्याचे दुबे यांनी सांगितले.महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि दक्षिण भारतातील चारही राज्यांमध्ये हॉकीची मजबूत परंपरा आहे. महाराष्ट्राचा आदित्य लालगे राष्ट्रीय संघात खेळत असून, ही समृद्ध परंपरा पुढे नेण्याचे काम युवा पिढी करत आहे.

Web Title: Grand plan make india hockey world champion again 10 ncoe centres annual scholarship of 620 lakh olympic 2036 special story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Hockey Team India
  • Indian Hocket Team
  • navarashtra special
  • Olympic
  • Sports News

संबंधित बातम्या

World Plant Milk Day 2026: हृदयरोग आणि अपचनावर मात! जाणून घ्या बदाम आणि सोया दूध पिण्याचे थक्क करणारे आरोग्यदायी फायदे
1

World Plant Milk Day 2026: हृदयरोग आणि अपचनावर मात! जाणून घ्या बदाम आणि सोया दूध पिण्याचे थक्क करणारे आरोग्यदायी फायदे

Hockey World Cup मध्ये Team India चा नेदरलँड्सकडून दारुण पराभव, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी…
2

Hockey World Cup मध्ये Team India चा नेदरलँड्सकडून दारुण पराभव, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी…

Madras Day: मद्रास दिनानिमित्त जाणून घ्या चेन्नईचा गौरवशाली इतिहास; 1639 चा करार, स्थापत्यकलेचे वैभव आणि आधुनिक शहराची खास गोष्ट
3

Madras Day: मद्रास दिनानिमित्त जाणून घ्या चेन्नईचा गौरवशाली इतिहास; 1639 चा करार, स्थापत्यकलेचे वैभव आणि आधुनिक शहराची खास गोष्ट

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा
4

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.