Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT vs LSG : IPL 2025 च्या अंतिम सामन्यापूर्वी Gujrat Titans ने जर्सीचा रंग बदलला, चाहत्यांची जिंकली मने.., नेमकं कारण काय? 

आयपीएल २०२५ चा ६४ वा सामना काल गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. सामन्यात गुजरातच्या खेळाडूंच्या जर्सीचा रंग बदलेला दिसून आला. यामागील कारण देखील समोर आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 23, 2025 | 11:03 AM
GT vs LSG: Gujrat Titans changed the color of the jersey before the final match of IPL 2025, won the hearts of the fans.., what is the real reason?

GT vs LSG: Gujrat Titans changed the color of the jersey before the final match of IPL 2025, won the hearts of the fans.., what is the real reason?

Follow Us
Close
Follow Us:

GT vs LSG : आयपीएल २०२५ चा ६४ वा सामना काल गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर हा सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सला लखनऊ सुपर जायंट्सकडून ३३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. लखनौने गुजरातच्या संघासमोर 236 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संघ २०२ धावांपर्यंतच पोहचू शकले. या सामन्यापूर्वी  गुजरातच्या खेळाडूंच्या बदलेल्या जर्सीच्या रंगाची चर्चा सुरू झाली होती. या सामन्यात गुजरातचा संघ लव्हेंडर जर्सी घालून मैदानात उतरला होता.

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात, गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी एका खास हेतूने लैव्हेंडर रंगाची जर्सी घालून मैदानात प्रवेश केला होता. चालू हंगामातील १३ व्या लीग सामन्यात, जीटीने सलग तिसऱ्या हंगामात कर्करोगाविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहिमेला पुढे नेण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे.

हेही वाचा : Ind-Pak war : ‘मी आणि माझे कुटुंब सैन्यासोबत..’, Neeraj Chopra बाबत बोलताना पाकिस्तानी Arshad Nadeem चे विधान चर्चेत..

अधिकृत वेबसाइटनुसार, गुजरात टायटन्स संघाने यावेळी कर्करोगाच्या रुग्णांची लवकर ओळख आणि काळजी घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझी चाहत्यांना ३०,००० लव्हेंडर झेंडे आणि १०,००० लव्हेंडर जर्सी मोफत वाटण्याची योजना आखत आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ रंग नाही तर त्यातून एक संदेश देण्याताळ आहे; ‘कर्करोग प्रतिबंध, नियमित आरोग्य तपासणी आणि सकारात्मक जीवनशैली’ स्वीकारण्यासाठी लोकांना पावले उचलण्यास प्रेरित करणे.

सामन्याविषयी

गुरुवारी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय गुजरात टायटन्सच्या अंगलट आल्याचे दिसले. लखनौ सुपर जायंट्सने मिचेल मार्शच्या(६४ चेंडूत ११७ धावा) शतकाच्या जोरावर २३५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात गुजरात २०२  धावाच करू शकले. यावेळी गिल आणि सुदर्शन जोडी आपली कमाल दाखवू शकली नाही आणि अत्याचा फटका हा संघाला बसला. परिणामी गुजरातला ३३ धावांनी पराभूत व्हावे लागले.

हेही वाचा : SRH vs RCB : आरसीबीची अव्वल स्थानावर नजर! एसआरएचसमोर आज प्लेऑफमधील बंगळुरूचे आव्हान..

दोन्ही संघांचे अंतिम इलेव्हन

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.

लखनौ सुपर जायंट्स: मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओ’रुर्के

Web Title: Gt vs lsg gujrat titans changed the color of the jersey what is the real reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 11:03 AM

Topics:  

  • GT vs LSG
  • Gujrat Titans
  • IPL 2025
  • Rishabh Pant
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 
1

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?
2

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?

IND vs SA 1st Test : रवींद्र जडेजाची अजून एक कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज…
3

IND vs SA 1st Test : रवींद्र जडेजाची अजून एक कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज…

IND vs SA : कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’, वीरेंद्र सेहवागला मागे टाकत रचला इतिहास
4

IND vs SA : कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’, वीरेंद्र सेहवागला मागे टाकत रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.