Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: मुंबई पलटण अहमदाबादमध्ये राडा घालणार; दुसऱ्या विजयासाठी हार्दिक सेना सज्ज…

आतापर्यंत आयपीएलच्या हंगामात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स तब्बल 8 वेळेस आमनेसामने आलेले आहेत. यामध्ये गुजरात टायटन्सचे पारडे मजबूत दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 20, 2026 | 05:03 PM
IPL 2026: मुंबई पलटण अहमदाबादमध्ये राडा घालणार; दुसऱ्या विजयासाठी हार्दिक सेना सज्ज...

IPL 2026: मुंबई पलटण अहमदाबादमध्ये राडा घालणार; दुसऱ्या विजयासाठी हार्दिक सेना सज्ज...

Follow Us
Follow Us:

गुजरात विरुद्ध मुंबईमध्ये आयपीएलचा थरार 
रोहित शर्मा खेळणार की नाही याकडे लक्ष 
हेड टू हेड रेकॉर्डमध्ये गुजरातचे पारडे जड

MI vs GT Tata IPL 2026 Live Updates: आज मुंबई इंडियन्स अन् गुजरात टायटन्समध्ये महामुकाबला होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. अहमदाबादच्या (IPL 2026) नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई गुजरात आमनेसामने येणार आहेत. दरम्यान आज आपण मुंबई विरुद्ध गुजरातचा हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊयात.

आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचा तर शुभमन गिल गुजरातचा कर्णधार आहे. मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. सलग 4 सामन्यात झालेला पराभव मुंबई इंडियन्सला झोंबतो आहे. त्यामुळे आज हार्दिक पंड्या आणि मुंबईच्या टीमकडे सर्वांचे लक्ष असेल.

जसप्रीत बुमराह, दीपक चाहर आणि अन्य गोलंदाजांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. टर कर्णधार हार्दिक पंड्या संघात काही महत्वाचे बदल करतो का ते देखील पहावे लागेल. रोहित शर्मा आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्याला देखील कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

IPL 2026: मुंबई पलटणमध्ये मोठे फेरबदल होणार; Rohit शर्मा खेळणार? पहा Playing 11

आतापर्यंत आयपीएलच्या हंगामात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स तब्बल 8 वेळेस आमनेसामने आलेले आहेत. यामध्ये गुजरात टायटन्सचे पारडे मजबूत दिसून येत आहे. गुजरात टायटन्सने 5 तर मुंबई इंडियन्सने 3 सामने जिंकले आहेत. यंदाच्या हंगामात दोन्ही संघ प्रत्येकी 5 सामने खेळले आहेत. त्यामध्ये गुजरातने 3 तर मुंबई इंडियन्सने 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गुजरातच्या संघाचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

आजचा पीच रिपोर्ट काय?

अहमदाबाद येथील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात हाय स्कोअरिंग मुकाबला पाहायला मिळू शकतो. या पीचवर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. आतापर्यंत अहमदाबाद स्टेडियमवर आयपीएलचे 46 सामने खेळवले गेले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी 23 सामने जिंकले गेले आहेत. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना देखील 23 सामने जिंकले गेले आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरविरुद्ध पहिला सामना जिंकून 12 वर्षांची परंपरा मोडली होती. मात्र त्यानंतर हार्दिक पंड्या आणि मुंबई पलटणला मिळालेला सूर हरवला असल्याचे दिसत आहे. बुमराह आणि हार्दिक पंड्यामध्ये मॅचदरम्यान बाचाबाची झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. मात्र त्यातली सत्यता नेमकी कळू शकलेली नाही.

GT vs MI Pitch Report: मुंबई ‘पलटण’चा हरवलेला सूर सापडणार की…? अहमदाबादच्या पीचचा रिपोर्ट काय?

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक) , वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स्, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, अशोक शर्मा, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मिचेल सँटनर / ए. एम. गझनफर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे

Web Title: Gujrat titans vs mumbai indians hed to head records hardik shubhman ahmedabad live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • GT VS MI
  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?
1

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
2

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात
3

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.