फोटो सौजन्य - सोशल मीडिया
हर्षित राणा : कोलकाता नाईट रायडर्सचा हर्षित राणा आयपीएल २०२४ मध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर त्याने आयपीएल २०२४ मध्ये एक कृत्य केलं होत त्यामुळे त्याला बॅन करण्यात आले होते. हर्षित राणा याने आयपीएल २०२४ मध्ये मयंक अग्रवाल याचा विकेट घेतल्यानंतर फ्लाय किस केली त्यामुळे त्याच्यावर बीसीसीआयने कारवाई केली होती. आता दुलीप ट्रॉफी ५ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. यामध्ये काल सामने पार पडले. दुलीप करंडक ट्रॉफीमध्ये हर्षित राणा याला इंडिया डी संघामध्ये जागा मिळाली आहे. आता पुन्हा हर्षित राणा याने पुन्हा एकदा तीच चूक केली आहे, नक्की प्रकरण काय? यासंदर्भात सविस्तर वाचा.
हर्षितने दुलीप ट्रॉफीमध्ये आयपीएलप्रमाणे फ्लाइंग किस दिला होता अन त्यासाठी हर्षितला दंडही ठोठावण्यात आला होता. आता हर्षितने रुतुराज गायकवाडला फ्लाइंग किस दिला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हर्षित राणा भारत क कर्णधार रुतुराज गायकवाडला स्लिप कॅचद्वारे बाद करताना दिसत आहे. आऊट होताच हर्षित त्याच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये फ्लाइंग किस देतो. आयपीएलमध्ये दंड ठोठावला असूनही हर्षितने पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली. हर्षित आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा भाग आहे.
pic.twitter.com/NgWR8YGG9O — Gill Bill (@bill_gill76078) September 5, 2024
कोलकाता नाईट रायडर्स गोलदांज हर्षित राणाने मागील काही महिन्यांमध्ये आयपीएल २०२४ मध्ये त्याने त्याच्या गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केले आहे. भारत क आणि भारत ड यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी हर्षितने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. हर्षितने ७ षटके टाकली, ज्यात त्याने २ बळी घेतले. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हर्षितने ७ पैकी ५ मेडन षटके टाकली. त्याने केवळ १३ धावा केल्या. हर्षित हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हर्षितशिवाय अक्षर पटेलनेही २ बळी घेतले. मात्र, अक्षरने या काळात ६ षटकांत १६ धावा दिल्या.