राष्ट्रीय हॅंडबॉल स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया)
कल्याणमध्ये राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे स्पर्धेचे आयोजन
तिम सामन्यात हरियाणा संघाने पटकावले विजेतेपद
कल्याण: कल्याण शहरात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेला (Sports News)खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणमधील फायनल, क्रमांक सहाच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक उमेश बोरगावकर, नगरसेवक संकेत भोईर, नगरसेविका स्वप्नाली केने, नगरसेविका अर्पणा भोईर यांनी आयोजित केला होता. देशभरातून सहभागी झालेल्या संघांनी अत्यंत चुरशीचे सामने खेळत प्रेक्षकांचे मनोरंजन केले .पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात हरियाणा संघाने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले. तर महिला गटात जबलपूर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेमुळे कल्याणमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना मिळत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी सांगितले की, अशा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळते आणि भविष्यात अधिक खेळाडू घडण्यास मदत होते. कल्याण नगरीसाठी इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, पुढील वर्षी यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






