हीथ स्ट्रीक : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीकचं निधन झाले आहे. काही दिवसापूर्वीच त्याचे निधन झाले असे वृत्त आले होते. परंतु आता ही अफवा नाही, हीथच्या निधनाच्या वृत्ताला कुटुंबियांनी दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी हीथ स्ट्रीकच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. जगभरामधील खेळाडूंनी हिथ स्ट्रीकला श्रद्धांजली वाहिली होती. परंतु काही वेळामध्ये त्याचा सहकारी आणि जिम्बाब्वेचा खेळाडू हेन्री ओलांगा यांनी हीथ स्ट्रीकच्या निधनाचं वृत्त फेटाळलं होतं. त्याचबरोबर त्याने ट्विटच्या माध्यमातून स्ट्रीकसोबतच्या व्हाट्सअँप चॅटचा स्क्रिनशॉर्टही शेअर केला होता.
परंतु आता मात्र हे खरंच अष्टपैलू हीथ स्ट्रीक या जगातून निघून गेला असून त्याने आपल्या सर्वांचा कायमचा निरोप घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळणाऱ्या हीथ स्ट्रीकच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २१६ विकेट्स आहेत. यादरम्यान त्यानं १६ वेळा एका डावात ४ विकेट्स आणि ७ वेळा एका डावांत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्येही हीथ स्ट्रीकची गोलंदाज म्हणून धमाकेदार कामगिरी पाहायला मिळाली आहे.
हीथ स्ट्रीकनं ५० ओव्हर्सच्या फॉर्मेटमध्ये २९.८२ च्या सरासरीनं २३९ विकेट्स घेतले आहेत. यादरम्यान त्यानं आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत एका डावांत ४ विकेट्स आणि एकदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. हीथ स्ट्रीकच्या फलंदाजीची तर बातच न्यारी. हा अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरला की, जणू वादळंच यायचं. आपल्या कारकीर्दीत स्ट्रिकनं कसोटी क्रिकेटमध्ये १९९० धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये २९४३ धावा रचल्या आहेत. स्ट्रीकनं कसोटी क्रिकेटमध्ये १ शतक आणि ११ अर्धशकतं झळकावली आहेत. यासोबतच त्याच्याकडे वनडेमध्ये १३ अर्धशतकांचा समावेश आहे.