'How do you play pull shot?': Ayush Mhatre, who made a spectacular debut in IPL, asks his hero.. Viral Video
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम अर्ध्यावर आला आहे. आतापर्यंत ३९ सामने खेळवण्यात आले आहेत. गुणतालिकेत मोठी उलटफेर बघायला मिळत आहे. गेल्या रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एक रोमांचक असा सामना पार पडला. सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव केला आहे. रोहित शर्माच्या धामकेदार खेळीमुळे मुंबईने चेन्नईचा ९ विकेट्सने पराभव केला. पण, या सामन्यात पदार्पणवीर आयुष म्हात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने उत्कृष्ट खेळ दाखवत सर्वांचे मनं जिंकून घेतले. सामन्यानंतर त्याने त्याच्या हिरोकडे जाऊन काही टिप्स देखील घेतल्या.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात १७ वर्षीय आयुष म्हात्रेने आपला शानदार खेळ दाखवला. त्याने अनेक मोठे फटके लगावले आणि १५ चेंडूत ३२ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. या शानदार खेळीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. पण, म्हात्रेचा हीरो कोण आहे? याबद्दल एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो आपल्या हीरोसोबत बोलताना दिसत आहे.
हेही वाचा : Rohit Sharma Retirement : अखेर सारेच आले समोर! रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीवर BCCI चे उत्तर..
मुंबईचा उदयोन्मुख खेळाडू आयुष म्हात्रे याने आयपीएलमध्ये चेन्नईकडून पदार्पण केले आहे. तो रोहित शर्माचा खूप मोठा चाहता आहे. तो त्याचा खेळ पाहतच मोठा झालाअ आहे. आयुष हा रोहितला आपला आदर्श मानत असल्याचे सांगतो. म्हणूनच मुंबईविरुद्धचा सामना संपल्यानंतर तो थेट त्याचा हिरो रोहित शर्माकडे जाऊयान पोहचला. जिथे शर्माने त्यांच्या खेळाचे कौतुक देखील केले.
शर्माने त्याचे केलेले कौतुक ऐकल्यानंतर आयुष म्हात्रेने रोहितकडून काही टिप्सही घेतल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, जेव्हा सूर्यकुमार यादवने रोहितला आयुष भेटायला आल्याचे सांगितले तेव्हा मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार म्हणाला, ‘आम्ही रणजी ट्रॉफीमध्ये एकत्र खेळलो आहोत.’ त्यानंतर म्हात्रेने रोहितला विचारले की, ‘तू इथून पुल शॉट कसा खेळतोस?’ रोहित शर्मा आणि आयुष म्हात्रे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे पाहून चाहते म्हात्रेचे कौतुक करत आहेत.
Mumbaikars चा bond 💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvCSK pic.twitter.com/xBpvqQihcG
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2025
हेही वाचा : KKR vs GT : राणासोबत पंगा महागात! बटलरचा झेल चुकताच, हर्षितच्या रुद्रावताराचे झाले दर्शन..
अधिक माहिती अशी की, अलीकडेच रोहित शर्माने रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ठरलेल्या मुंबई संघासाठी एक सामना खेळला होता. त्या काळात म्हात्रे आणि रोहित ड्रेसिंग रूम शेअर करत होते. मुंबई-जम्मू काश्मीर सामना संपल्यानंतर म्हात्रेने रोहितसोबतचा स्वतःचा एक फोटो इंस्टाग्रामवर देखील पोस्ट केला होता.