रोहित शर्मा(फोटो-सोशल मिडिया)
Rohit Sharma retires from Test cricket : भारतात सध्या आयपीएल २०२५ चा थरार सूरु आहे. हा हंगाम अर्ध्यावर आला आहे. याच दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सोमवारी (२१ एप्रिल) टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी केंद्रीय करार जाहीर करण्यात आले. बीसीसीआयच्या या करारात एकूण ३४ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. हे करार ४ श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. या काळात यादीमध्ये नवीन ७ खेळाडू दिसणार आहेत. भारतात, ए+ ग्रेड असलेल्या खेळाडूला दरवर्षी ७ कोटी रुपये देण्यात येतात. अ श्रेणीतील खेळाडूला दरवर्षी ५ कोटी रुपये. तर ब श्रेणीतील खेळाडूला ३ कोटी रुपये. तर सी ग्रेड खेळाडूला दरवर्षी १ कोटी रुपये मिळत असतात.
गेल्या वर्षीप्रमाणे यावेळी देखील बीसीसीआयने चार भारतीय खेळाडूंना ए प्लस ग्रेडमध्ये स्थान दिले आहे. या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा सामावेश आहे. या घोषणेनंतर, भारतीय कर्णधारासाठी एक गोष्ट येथे स्पष्ट झाली की तो सध्या तरी टीम इंडियाचा भाग राहणार आहे. यापूर्वी त्याच्या निवृत्ती आणि २०२७ च्या विश्वचषकात खेळण्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यावर रोहिटणे देखील उत्तर देऊन झाले आहे. आता पुन्हा हा मुद्दा समोर आल्याने त्यावर थेट बीसीसीआयनेच उत्तर दिले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीबाबतच्या बातम्या जोर धरू लागल्या होत्या. मागील वर्षी जेव्हा भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. भारतीय कर्णधारासाठी हा हंगाम वाईट राहीला होता. त्याच्या खराब फॉर्ममुळे संघाची कामगिरीही खालावत गेल्याचे दिसून आले. त्यावेळी सर्वांना वाटत होते की, रोहित शर्माच्या फॉर्ममुळे टीम इंडियाचे संतुलन बिघडत आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यातून रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. त्यानंतर, तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
हेही वाचा : KKR vs GT : राणासोबत पंगा महागात! बटलरचा झेल चुकताच, हर्षितच्या रुद्रावताराचे झाले दर्शन..
रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत बीसीसीआयने उत्तर दिले आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक केंद्रीय करार यादीनंतर, रोहितच्या निवृत्तीच्या बातम्यांना आता थांबा मिळाला आहे. आता असे बोलले जाता आहे, की वार्षिक केंद्रीय करार यादी जाहीर होण्यापूर्वी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी रोहितला त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले असावे. यानंतरच त्याला ए प्लस श्रेणीत स्थान देण्यात आल्याचे बोलले जाता आहे. जर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असला असतास तर त्याला A+ ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले नसते.