हर्षित राणा(फोटो-सोशल मिडिया)
KKR vs GT : आयपीएल २०२५ चा १८ व्या हंगामाचा थरार अर्ध्यावर आला आहे. आतापर्यंत ३९ सामने खेळवण्यात आले आहेत. काल झालेल्या ३९ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स समोरासमोरा आले होते. या सामन्यात गुजरात संघाने कोलकाता संघाचा पराभव केला आहे. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना १९८ धावा केल्या. प्रतिउत्तरात कोलकात्याला १५९ धावाच करता आल्या, परिणामी केकेआरला ३९ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात विकेटकीपर फलंदाज जोस बटलरने १७८ च्या स्ट्राईक रेटने २३ चेंडूत ४१ धावा केल्या. त्याचा एक झेल सोडणे केकेआरला चांगलाचा महागात पडला, तसेच झेल चुकवला म्हणून गोलंदाज हर्षित राणा संतपेलला दिसून आला.
शेवटी, जोस बटलरच्या या निर्णायक खेळीमुळे, गुजरात टायटन्स कोलकाता नाईट रायडर्ससमोर १९९ धावांचे लक्ष्य उभे करू शकला. दुसरीकडे, कोलकाताच्या गोलंदाजांनी सामन्यात खूपच निराशाजनक कामगिरी केली. त्याचा फटका संघाला बसला. त्यातच गुजरातच्या डावात एके ठिकाणी केकेआरचा गोलंदाज हर्षित राणा रागावलेला दिसून आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, केकेआरचा गोलंदाज वैभव अरोराकडून हर्षित राणाच्या गोलंदाजीवर जोस बटलरचा एक सोपा झेल सुटला. यानंतर हर्षित राणा केकेआरचा दुसरा गोलंदाज वैभव अरोरावर चिडेलेला दिसून आला. कारण, हर्षित राणाकडून बटलरसाठी खूप विचारपूर्वक योजना आखण्यात आली होती. त्याला बाहेरचा रास्ता दाखवणींशी ही एक उत्तम संधी होती. मात्र, वैभवने कॅच सोडल्यामुळे जोस बटलरला जीवनदान मिळाले आणि त्याने वेगवान खेळी करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहचवले.
गुजरात टायटन्सच्या १५ व्या षटकात हा प्रकार घडून आला. या षटकात गुजरातला वेगाने धावा काढायच्या होत्या. त्यानंतर केकेआरकडून हर्षित राणा गोलंदाजी करायला आला. यादरम्यान, त्याने बटलरला एक लांबीचा चेंडू टाकला. जोस बटलरने तो हवेत मारायचा प्रयत्न केला. मिड-विकेटवर उभ्या असलेल्या वैभव अरोराला चेंडू पकडण्याची पूर्ण संधी होती, परंतु, तो झेल घेण्यास अपयशी ठरला. यावर हर्षित राणा चिडला.
आयपीएल २०२५ चा ३९ वा सामना काल कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने कोलकाता नाईट राइडर्सला पराभूत केले. कोलकाताच्या गोलंदाजांनी या सामन्यात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे गुजरातच्या संघाने १९८ धावांचा मोठा डोंगर उभा केला. कोलकाताच्या संघाने आपल्या पहिल्या दोन विकेट लवकर गामावल्या होत्या. त्यामुळे संघाला धाव करण्यात अडचणी आल्या आणि रन रेट देखील वाढला. या सर्वांचा परिणाम म्हणजे गुजरात टायटन्सच्या संघाने हा सामना 39 धावांनी जिंकला. गुजरात टायटन्सच्या संघाने कोलकात्याला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केळे.
कोलकाता नाइट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती
गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज