फोटो सौजन्य - सोशल मीडिया
महिला T20 विश्वचषकाचे बक्षीस रक्कम : जूनमध्ये पुरुषांचा T20 विश्वचषक झाला आणि भारताच्या संघ जेतेपद मिळवण्यात यशस्वी झाला. त्याचा आनंद संपूर्ण देशामध्ये साजरा करण्यात आला होता. यावेळी भारताच्या संघावर बीसीसीआय त्याच्या भारताच्या अनेक राजकीय पक्षांनी किंवा भारतीय सरकारने पैशांचा पाऊस केला होता. आता महिला T20 विश्वचषक स्पर्धा काही दिवसनमध्ये सुरु होणार आहे. त्यासाठी जगभरामधील क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. ICC ने महिला T20 विश्वचषक 2024 साठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2024 3 ऑक्टोबरपासून UAE मध्ये सुरु होणार आहे.
महिला T20 विश्वचषक कुठे होणार यावरून मध्ये वाद होत होते, याआधी या महत्त्वाच्या स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशला मिळणार होते. मात्र तेथील राजकीय अस्थिरतेनंतर झालेल्या विरोधामुळे, सुरक्षा लक्षात घेऊन ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीचे सामने आता शारजाह आणि दुबईच्या मैदानावर खेळवले जातील.
आयसीसीने 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मागील विश्वचषकाच्या तुलनेत वाढ केली आहे. ICC ने 2024 महिला T20 विश्वचषक स्पर्धेची बक्षीस रक्कम $7,958,080 पर्यंत वाढवली आहे, जी 2023 च्या आवृत्तीपेक्षा दुप्पट आहे. ही लक्षणीय वाढ हे सुनिश्चित करते की महिला T20 विश्वचषक 2024 च्या विजेत्याला तब्बल $2.34 दशलक्ष मिळतील, जे 2023 मध्ये चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला दिलेल्या $1 दशलक्षपेक्षा 134% अधिक आहे. ही लक्षणीय वाढ हे सुनिश्चित करते की महिला T20 विश्वचषक 2024 च्या विजेत्यांना तब्बल $2.34 दशलक्ष मिळतील, जे 2023 मध्ये चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला दिलेल्या $1 दशलक्षपेक्षा 134% अधिक आहे.
The stakes just got higher 🚀
Biggest-ever prize money pool announced for ICC Women’s #T20WorldCup 2024 👇https://t.co/CSuMLPjbwV
— ICC (@ICC) September 17, 2024
महिला T20 विश्वचषक 2024 च्या उपविजेत्या संघावरही भरपूर पैशांचा वर्षाव केला जाणार आहे. उपविजेत्या संघाची बक्षीस रक्कमही गेल्या विश्वचषकाच्या तुलनेत 134% ने वाढली आहे, ज्यामुळे त्यांना आगामी आवृत्तीत $1.17 दशलक्ष रक्कम दिली जाईल. प्रत्येक सेमीफायनलिस्टला $675,000 मिळतील, जे त्यांच्या 2023 पेआउटपेक्षा तिप्पट आहे.