पॅरिस ऑलिम्पिक २०२४ : भारताचे बॅडमिंटन खेळाडू सध्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत आहेत. काल भारताचे बॅडमिंटन खेळाडू पॅरिसमध्ये लढताना दिसले. यामध्ये भारताची स्टार महिला बॅडमिंटन खेळाडूने शेवटच्या साखळी सामन्यामध्ये सहज विजय मिळवून राउंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे. तर भारताचा युवा बॅडमिंटपटू लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या जोनाथन क्रिस्टीला सलग दोन्ही सेटमध्ये पराभूत करून राउंड १६ मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याने सुद्धा त्याचा शेवटचा साखळी सामना जिंकून राउंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे. परंतु आज पॅरिस ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन कोर्टवर ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळणार आहे.
भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय या दोघांनी राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे आणि यामध्ये त्यांना दोघांना एकमेकांच्या विरोधामध्ये लढावे लागणार आहे. एकीकडे पहिले तर हा भारतीयांसाठी ऐतिहासिक क्षण आहे तर दुसरीकडे भारतीय चाहत्यांसाठी हा क्षण दुःखद आहे कारण यामधून एक बॅडमिंटनपटू पॅरिस ऑलिम्पिकच्या पदकाच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये कोण जिंकणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.
भारतीय बॅडमिंटनपटूच्या कामगिरीचा विचार केला सहभागी झालेल्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. यामध्ये पीव्ही सिंधू ने राउंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे, तर सात्विकसाईराज रानकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने दमदार कामगिरी करत उपांत्य पूर्व फेरी गाठली आहे. आज त्यांचा सामना मलेशियाशी होणार आहे. तर भारतीय वैयक्तिक स्पर्धेमध्ये यंदा दोन खेळाडूंना पाठवण्यात आले होते आणि आज त्यांचा सामना एकमेकांच्या विरोधात होणार आहे.