महिला T20 World Cup 2024 : आयसीसीने महिला T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. T20 विश्वचषक 2024 चे यजमानपद बांग्लादेशमध्ये आहे. भारताच्या संघाला अ गटामध्ये स्थान मिळाले आहे. त्यात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचेही संघ आहेत. T20 विश्वचषक 2024 स्पर्धा ३ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. T20 विश्वचषक 2024 चा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये रंगणार आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
क्रिकेट चाहत्यांना आतुरता असेल ती भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची. महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 6 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचा सामना क्वालिफायर 1 संघाशी होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 13 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. पहिल्या सेमीफायनलबद्दल बोलायचे झाले तर तो १७ ऑक्टोबरला खेळवला जाईल आणि दुसरा सेमीफायनल १८ ऑक्टोबरला होईल. अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
ICC महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने ढाका आणि सिलहटमध्ये १९ दिवसांत होतील. स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. अ गटात पाच संघ आहेत. ब गटातही पाच संघ आहेत. या गटात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि क्वालिफायर 1 चे संघ असतील. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि क्वालिफायर 2 संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ एकूण चार गट सामने खेळणार आहे. यानंतर प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. 17 व 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.