
पाकिस्तान क्रिकेट संघ
इंग्लंडविरुद्धच्या सिरिजमध्ये व्हाईटवॉश पाकिस्तान क्रिकेट टीमला स्वीकारावा लागला आहे. त्यातच त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सिरीजमधील दारुण पराभवानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पाकिस्तान संघावर कठोर दंडात्मक कारवाई केली आहे. स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेतून पाकिस्तानचे तब्बल ११ पॉईंट्स कापले आहेत. तसेच सर्व खेळाडूंवर ५० टक्के मॅच फीचा दंड ठोठावला आहे.
ENG Vs PAK: बाबर आझमला इतिहासजमा करा! ४ वर्षे, ३९ डाव अन् झिरो सेंच्युरी, ‘फ्लॉप शो’ कायम
इंग्लंडने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. पाकिस्तानच्या संघाने निर्धारित वेळेत तब्बल 11 ओव्हर्स कमी टाकल्या होत्या. त्यामुळे आयसीसीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप नियमांनुसार, ठरवून दिलेल्या वेळेत कमी टाकलेल्या प्रत्येक षटकामागे संघाचा १ पॉईंट्स कापला जातो. त्याप्रमाणे पाकिस्तानचे 11 पॉईंट्स कापण्यात आले आहेत. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी ५ टक्के दंडाची तरतूद आहे. त्यानुसार सर्व खेळाडूंच्या मॅच फीमधून ५० टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या ३-० अशा मानहानीकारक पराभवामुळे आधीच बॅकफूटवर गेलेल्या पाकिस्तान संघाची या कारवाईमुळे आणखी बिकट अवस्था झाली आहे. आयसीसीने 11 पॉईंट्स कट केल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे आता फायनल गाठण्याचे स्वप्न पाकिस्तानचे अपूर्ण राहणार आहे.
A further blow for Pakistan who have been hit with a pair of sanctions following their loss to England in the third #WTC27 contest in Birmingham.https://t.co/4pBrDK5K7n — ICC (@ICC) September 14, 2026
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील या सिरिजमध्ये इंग्लंडने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. पहिल्या सामन्यापासूनच पाकिस्तानची फलंदाजी आणि गोलंदाजी ढेपाळलेली दिसली. संपूर्ण सिरिजमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव करत ३-० अशी सिरिज जिंकली. पराभवाच्या या धक्क्यातून पाकिस्तान सावरत असतानाच आयसीसीच्या या कारवाईने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…
इंग्लंड दौरा पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या या सिरिजमध्ये पहिल्या दोन पराभवांनंतरच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अत्यंत कठोर पाऊल उचलत थेट ७ खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. या सर्व खेळाडूंना तात्काळ मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, निम्मा संघ बदलूनही पाकिस्तानचे नशीब बदलले नाही आणि तिसऱ्या सामन्यातही त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.