Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG Vs PAK: आधी लफडं करायचं अन् मग भोगायचं! तिसऱ्या टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महाभूकंप

England Vs Pakistan: इंग्लंडविरुद्धच्या सलग दोन कसोटी सामन्यांतील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा स्फोट झाला आहे. तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये अजून शेवटची कसोटी बाकी असतानाच पाकिस्तानने सिरिज गमावली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 07, 2026 | 07:45 PM
पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप

Follow Us
Follow Us:
  • तिसऱ्या सामन्याच्याआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप
  • 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार तिसरी कसोटी 
  • पाकिस्तानकडे शेवट गोड करण्याची असणार संधी 
England Vs Pakistan Test Series: सध्या इंग्लंड अन् पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सिरिज सुरू आहे. यामध्ये दोन टेस्ट पूर्ण झाल्या आहेत. इंग्लंडने ही सिरिज 2-0 ने जिंकली आहे. तर पाकिस्तान संघाचा दोन्ही सामन्यात दारुण पराभव झाला आहे. दोन्ही सामने गमावल्यानंतर पाकिस्तान संघात उलथापालथ सुरू झाली आहे. 9 ते 13 तारखेदरम्यान शेवटचा आणि तिसरा सामना खेळवला जाणार आहे. मात्र त्याआधी पाकिस्तान संघात मोठे भूकंप होत असल्याचे दिसून येत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सलग दोन कसोटी सामन्यांतील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा स्फोट झाला आहे. तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये अजून शेवटची कसोटी बाकी असतानाच पाकिस्तानने सिरिज गमावली आहे. या नामुष्कीनंतर पीसीबीने अत्यंत कठोर पाऊल उचलत अचानक तब्बल सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवले असून कोचिंग स्टाफचीही हकालपट्टी केली आहे.

सिरिज गमावल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंच्या वर्तनाची आणि शिस्तभंगाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या गंभीर आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. बोर्डाकडून अधिकृतपणे खेळाडूंच्या शिस्तभंगाचे कारण दिले जात असले, तरी पडद्यामागे हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे मानले जात आहे. खेळाडूंचे गैरवर्तन, आपापसातील मतभेद आणि इतर काही संशयास्पद हालचालींबाबत पीसीबीचे अधिकारी सध्या उघडपणे बोलणे टाळत असल्याचे समजते आहे.

PAK Vs ENG: लाज गेल्यावर आली अक्कल म्हणून लढवली शक्कल! PCB चा ‘धडक’ स्ट्राईक; पाकिस्तानात भूकंप

सिरिजमधील तिसरा आणि अंतिम सामना अद्याप बाकी असतानाच अर्ध्याहून अधिक खेळाडूंना आणि मुख्य प्रशिक्षकांसह सपोर्ट स्टाफला हटवण्यात आल्यामुळे पाकिस्तान संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ऐन मालिकेच्या मध्यमात झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत कलह आणि अनागोंदी पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.

ENG Vs PAK: आधीच सपशेल फ्लॉप अन् त्यात आला ताप! पाकड्यांना लागली नजर, ‘हा’ खेळाडू आजारी

लॉर्ड्स कसोटीदरम्यान इमाम-उल-हक दुखापतग्रस्त झाल्यामुळे मैदानातून बाहेर पडला होता. मात्र, तो खरोखरच दुखापतग्रस्त आहे की संघातून काढता पाय घेण्यासाठी त्याने दुखापतीचे बनावट नाटक रचले, असा गंभीर आरोप आता त्याच्यावर होत आहे. क्रीडा वर्तुळात आणि पाकिस्तानच्या माजी खेळाडूंकडून इमामच्या या वर्तनावर प्रचंड टीका होत आहे.  आरोप सिद्ध झाल्यास इमाम-उल-हकवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विकेटकिपर अन् फलंदाज मोहम्मद रिझवान याला अचानक मायदेशी बोलावल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Web Title: Pcb enquiry started for pakistan cricket team imam ul haq before third test against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Pakistan Cricket Board
  • Pakistan Cricket team
  • Pakistan vs England

संबंधित बातम्या

PAK Vs ENG: लाज गेल्यावर आली अक्कल म्हणून लढवली शक्कल! PCB चा ‘धडक’ स्ट्राईक; पाकिस्तानात भूकंप
1

PAK Vs ENG: लाज गेल्यावर आली अक्कल म्हणून लढवली शक्कल! PCB चा ‘धडक’ स्ट्राईक; पाकिस्तानात भूकंप

Eng Vs PakL: त्यांचं रक्तचं घाणेरडं! ‘या’ खेळाडूचे दुखापतीचे ‘ढोंग’? तर रिझवानचा ‘द एंड’, PCB थेट…
2

Eng Vs PakL: त्यांचं रक्तचं घाणेरडं! ‘या’ खेळाडूचे दुखापतीचे ‘ढोंग’? तर रिझवानचा ‘द एंड’, PCB थेट…

ENG Vs PAK: आधीच सपशेल फ्लॉप अन् त्यात आला ताप! पाकड्यांना लागली नजर, ‘हा’ खेळाडू आजारी
3

ENG Vs PAK: आधीच सपशेल फ्लॉप अन् त्यात आला ताप! पाकड्यांना लागली नजर, ‘हा’ खेळाडू आजारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.