ICC ODI Worldcup : 2027 वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक उद्या होणार जाहीर, जागतिक तिकिट लॉटरीचीही घोषणा, सौजन्य : आयएएनएस
2027 चा वनडे विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बॉब्वे आणि नांबियामध्ये 2 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत खेळवण्यात येणार आहे. 14 संघांच्या या स्पर्धेत 12 यजमान स्थळी एकूण 57 सामने होतील. वेळापत्रकाच्या घोषणेच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण भारतात रात्री 8.30 सा जियो हॉटस्टार (Jio Hotstar) आणि स्टार स्पोर्ट्स (Star Sports) नेटवर्कवर केले जाईल. हा कार्यक्रम केपटाऊन येथील समकालीन कला संग्रहालय ‘झिट्झ मोकाआ’ (Zeitz MOCAA) येथे आयोजित करण्यात येणार आहे.
वेळापत्रकाच्या घोषणेसह आयसीसीकडून जागतिक तिकीट लॉटरीलाही सुरुवात करण्यात येणार आहे.. याच्या माध्यमातून जगभरातील क्रिकेट चाहत्यांना विश्वचषक सामन्यांचे तिकिट प्राप्त करण्याची संधी मिळेल. दरम्यान, यंदा 30 सप्टेंबरच्या कटऑफ तारखेपर्यंत 14 पैकी 10 संघांनी थेट स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉब्वेला थेट प्रवेश मिळाला आहे. त्यांच्याशिवाय भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशने पात्रता मिळवली आहे. इतर चार स्थानांचा निर्णय पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या जागतिक क्वालिफायरच्या माध्यमातून होईल. दोन वेळचा विश्वचषक विजेता संघ वेस्ट इंडिजला देखील क्वालिफायर खेळावे लागणार आहे.
भारतीय क्रिकेटमधील स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी (Ro-Ko) 2027 चा विश्वचषक आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा विश्वचषक ठरू शकतो. त्यामुळे हा विश्वचषक जिंकत ते आपल्यासाठी अविस्मरणीय आठवणी साठवण्याचा प्रयत्न करतील. जिओ स्टारसोबत संवाद साधताना रोहित शर्माने 2024 टी-२० विश्वचषक जिंकण्याच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, मला 50 षटकांच्या या फॉरमेटमध्ये पुन्हा एकदा त्याप्रकारच्या खेळीचा आनंद घ्यायचा आहे.
रोहित म्हणाला की, भारतासाठी विश्वचषक जिंकणे अत्यंत खास क्षण आहेत. आमच्याकडे टी-20 फॉरमेटमध्ये दोन वेळा विश्वचषक जिंकण्याचा अनुभव आहे. 2007 साली मी फक्त 20 वर्षांचा युवा खेळाडू गोतो, तर 2024 मध्ये भारताने मोठ्या अंतरानंतर आयसीसीचे जेतेपद पटकावले होते.
दुसरीकडे, विराट कोहली म्हणाला की, 2027 चा विश्वचषक भारतासाठी माझा अखेरचा विश्वचषक असेल व माझ्यासाठी ही मोठी प्रेरणा आहे. तो पुढे म्हणाला की, मला मैदानात सर्व काही झोकून घ्यायचे आहे. माझे लक्ष्य विश्वचषक जिंकून देण्याचे आहे. त्यासाठी मी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार.
तसेच आयसीसीची मोफत तिकिट बॅलेट प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होत 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत चालेल. चाहत्यांना प्रत्येक सामन्यासाठी सर्व श्रेणीत जास्तीत जास्त चार तिकिट मिळू शकतात. जर तिकिटांची मागणी स्टेडियम क्षमतेपेक्षा जास्त असल्यास संगणिकृत रँडम ड्रॉच्या माध्यमातून तिकिटांचे वाटप करण्यात येईल.






